सामाजिक

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त किनवट मध्ये ऐतिहासिक डिजीटल फलक अनावरण.

किनवट : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त युवा उद्योजक आणि VIP रीयल इस्टेट व VIP ऑफिस चे संचालक आशिष विठ्ठलराव शेळके यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चातुन शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नावाचे डिजिटल फलक जयंती समिती च्या आग्राहास्तव स्वतः आशिष शेळके यांच्या हस्ते अनावरण करुन एक ऐतिहासिक धम्मदान किनवट शहराला दिले आहे.


कित्येक वर्षांपासून किनवट शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील परिसाराला आंबेडकर चौक या नावाने संबोधले जाते. परंतु आज पर्यंत तिथे अशा नावाचे कुठलेही फलक, पाटी अथवा ते नाव कुठेही दर्शनी ठिकाणी नव्हते. हिच बाब जयंती समिती अध्यक्ष आकाश आळणे आणि सचिव प्रतिकेश ओंकार व सर्व समितीने आशिष शेळके यांना सांगितले, तर त्याच क्षणी आशिष शेळके यांनी हे फलक मी माझ्याकडुन सर्व स्वखर्चाने त्या नावाचे डिजिटल बोर्ड धम्मदान म्हणून देईल असे सांगितले. आणि फक्त सांगितलेच नाही तर अवघ्या आठ दिवसांत त्या नावाचे एक आकर्षक डिजीटल बोर्ड तयार करुन तिथे १४ एप्रिल रोजी लावण्यात ही आले.
आशिष शेळके यांच्या अशा या ऐतिहासिक धम्मदानाचे, तसेच आकर्षक अशा ऐतिहासिक डिजीटल फलक चे सर्वच स्तरांतून शब्द सुमनाने मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. सर्व समाजातील व्यक्ती ने याचा बोध घेऊन आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या हेतुने आपण फुल न फुलाची पाकळी म्हणुन समाजासाठी काहीतरी धम्म दान दिले पाहिजे हे आशिष शेळके यांनी दाखवून दिले असे जनतेतून बोलल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button