संपादकीय

  • मोहर्रम, ताजिया आणि पडदा – श्रद्धेच्या नावावर शरियतशी तडजोड कुठवर?

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क:- २६ जून २६ मोहर्रमचा महिना हा इस्लामच्या इतिहासातील अत्यंत पवित्र आणि दुःखाचा महिना मानला जातो. हा महिना इमाम हुसैन आणि त्यांच्या ७२ निष्ठावान साथीदारांच्या अजोड हौतात्म्याची आठवण करून देतो. हे बलिदान संयम, सत्य, न्याय आणि इस्लामी तत्त्वांच्या रक्षणासाठी होते. पण आजच्या काळात, जेव्हा आपण रस्त्यांवर मोहर्रम किंवा ताजियांच्या मिरवणुका पाहतो, तेव्हा एक मोठा आणि अस्वस्थ करणारा विरोधाभास दिसून येतो. श्रद्धेच्या नावावर जे काही घडत आहे, ते खरोखरच इस्लामी शिकवणीच्या चौकटीत बसते का? हा प्रश्न आज प्रत्येक विचारशील मुस्लिमाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. नुकतेच मध्य प्रदेशातील मंदसौर सारख्या शहरांमध्ये (आणि आता इतरत्रही) असे चित्र वारंवार पाहायला मिळत आहे की, महिला आणि तरुण मुली ताजिया पाहण्याच्या नावाखाली, नटून–थटून, बुरख्या शिवाय(बेपर्दा) रस्त्यांवर फिरत आहेत. या पवित्र आणि गंभीर दिवसाला एका ‘छंद‘ किंवा ‘जत्रेचे‘ स्वरूप प्राप्त झाले आहे. हे इस्लामी शरियत आणि कर्बलाच्या मूळ संदेशाच्या अगदी विरुद्ध आहे. कर्बलाची घटना केवळ तलवारींची आणि सत्तेची लढाई नव्हती; ती धर्माच्या (दीन) तत्त्वांना वाचवण्याची लढाई होती. या ऐतिहासिक युद्धात इमाम हुसैन यांच्या सोबत त्यांच्या घरातील महिलाही उपस्थित होत्या. कर्बलाचा इतिहास साक्ष देतो की, जेव्हा इमाम हुसैन यांचे तंबू जाळण्यात आले आणि महिलांना बंदी…

    Read More »
  • जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणाचा संगम: ‘दै. श्रमिक लोकराज्य’चे आधारस्तंभ ज्ञानेश्वर डोईजड!

    “कर्तृत्ववान माणसाला वारशाची गरज नसते, त्याचे कार्यच त्याची ओळख निर्माण करते.” या ओळी आपल्या मुखेड तालुक्यातील एक धडाडीचे व्यक्तिमत्व, दै. श्रमिक लोकराज्यचे संपादक आणि माझे स्नेही सहकारी मित्र ज्ञानेश्वर डोईजड यांना तंतोतंत लागू पडतात. आज त्यांचा वाढदिवस! त्यानिमित्ताने त्यांच्या संघर्षाचा आणि यशाचा घेतलेला हा एक छोटासा आढावा. आजच्या काळात एखादे दैनिक वर्तमानपत्र चालवणे ही साधी गोष्ट नाही. कोणताही मोठा राजकीयवारसा पाठीशी नसताना आणि कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ नसताना, ज्ञानेश्वरजींनी केवळ स्वतःचीमेहनत, जिद्द आणि…

    Read More »
  • कलम आणि कायद्याचा बुलंद आवाज : ॲड. संदीप अण्णा कामशेट्टे

    पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून तो समाजाचा आरसा आहे. हा आरसा स्वच्छ ठेवण्याचे आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम जे मोजके लोक निष्ठेने करतात, त्यामध्ये ‘दैनिक पुण्यनगरी‘चे तालुका प्रतिनिधी ॲड. संदीप अण्णा कामशेट्टे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा छोटासा आढावा. संदीप अण्णा हे केवळ एक पत्रकार नाहीत, तर ते कायद्याचे जाणकार (एडव्होकेट) देखील आहेत. त्यांच्याकडे असलेल्या कायदेशीर ज्ञानामुळे त्यांच्या बातम्यांमध्ये एक वेगळीच खोली आणि अचूक ताजाणवते. अन्यायाविरुद्ध लढताना कायद्याची ढाल आणि लेखणीची तलवार कशी वापरावी, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अण्णांची कार्यशैली होय. तालुका प्रतिनिधी म्हणून काम करताना त्यांनी कधीही सत्तेसमोर गुडघे टेकले नाहीत. मग तो प्रश्न लेडीचा असो रेल्वेचा व शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचा असो, गावातील रस्त्यांचा असो किंवा सर्वसामान्यांच्या नागरी सुविधांचा; अण्णांनी नेहमीच आपल्या लेखणीतून प्रशासनाला जाब विचारला आहे. ‘पुण्यनगरी‘च्यामाध्यमातून त्यांनी मांडलेले प्रश्न केवळ कागदावर न राहता, मार्गी लागेपर्यंत त्यांनी त्याचा पाठपुरावा केला आहे. कामाच्या व्यापातही संदीप अण्णांनी माणसे जोडण्याचे कसब जपले आहे. ‘अण्णा‘ या नावाला साजेसात्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ आणि मदतीला धावून जाणारा आहे. नव्या दमाच्या पत्रकारांसाठी ते नेहमीच मार्गदर्शक राहिले आहेत. समाजातील प्रत्येक घटकाशी त्यांचा थेट संपर्क असून, लोकांच्या सुख–दुःखातते नेहमी हिरीरीने सहभागी होतात.…

    Read More »
  • लेखणीचा कणा आणि मैत्रीचा झरा: संजय अण्णा कांबळे.

    मुखेड प्रतिनिधी:श्रमिक एकता न्यूज़ २४ एप्रिल २६  पत्रकारिता हे केवळ क्षेत्र नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे, हे आपल्या कृतीतून…

    Read More »
  • पत्रकार घडवणारी माणूसरुपी फॅक्टरी: निर्भीड पत्रकारितेचा महामेरू ‘निखिल वागळे’

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २३ एप्रिल २६ पत्रकारिता क्षेत्रातील एक असे नाव, ज्यांच्या आवाजाने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणतात आणि ज्यांच्या लेखणीने अन्यायाला वाचा फुटते, ते म्हणजे निखिल वागळे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या अष्टपैलू प्रवासाचा आढावा घेणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, एका जिवंत ‘पत्रकारिता विद्यापीठाचा‘ सन्मान करण्यासारखे आहे. निखिल वागळे यांना ‘पत्रकारितेतील बेधडक तोफ‘ म्हटले जाते, ते उगीच नाही. सडेतोड प्रश्न विचारणे आणि समोरची व्यक्ती कितीही मोठी असली तरी सत्याची साथ न सोडणे, हा त्यांचा स्वभाव आहे. ‘महानगर‘पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आजही तितक्याच प्रखरतेने सुरू आहे. लोकशाहीचा चौथास्तंभ भक्कम ठेवण्यासाठी त्यांनी दिलेली झुंज ही नव्या पिढीच्या पत्रकारांसाठी प्रेरणादायी आहे. निखिल सरांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी केवळ स्वतःची ओळख निर्माण केली नाही, तर शेकडोतरुण पत्रकारांना घडवले. आज मराठी आणि हिंदी पत्रकारितेत आघाडीवर असलेले अनेक संपादक आणि पत्रकार हे वागळे सरांच्या तालमीत तयार झाले आहेत. म्हणूनच त्यांना ‘पत्रकार घडवणारी माणूसरुपी फॅक्टरी‘ म्हटले जाते. त्यांनी केवळ तंत्र शिकवले नाही, तर पत्रकाराने समाजात वावरतानाकिती संवेदनशील आणि निडर असावे, याचे बाळकडू दिले. राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दांभिकपणावर त्यांनी नेहमीच प्रहार केले. त्यांच्या…

    Read More »
  • जगतज्योती महात्मा बसवेश्वर -आधुनिक युगातील तरुणाईचे दीपस्तंभ

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १९ एप्रिल २६ ‘कायकावे कैलास’ (काम हेच कैलास आहे) हा मंत्र देणारे १२ व्या शतकातील महान क्रांतीकारक, समाजसुधारक आणि लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची जयंती केवळ एक उत्सव नसून, ती विचारांच्या परिवर्तनाची वेळ आहे. आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात भरकटलेल्या तरुणाईला महात्मा बसवेश्वरांचे विचार एक नवी दिशा देऊ शकतात. आजचा युवक शॉर्टकटच्या शोधात असतो. पण महात्मा बसवेश्वरांनी शिकवले की, कोणतेही काम छोटे नसते. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली. “तुमचे काम प्रामाणिकपणे करणे, हाच खरा देव आहे,” हा त्यांचा संदेश आजच्या ‘स्टार्टअप‘ आणि ‘करिअर‘च्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तरुणांनी केवळ फळाची अपेक्षा न करता कष्टावर निष्ठा ठेवली, तर प्रगतीचे कैलास गाठणे कठीण नाही. हीच्या गप्पा मारतो, पण महात्मा बसवेश्वरांनी ९०० वर्षांपूर्वी ‘अनुभव मंटपा‘च्या माध्यमातून जगातील पहिली संसद स्थापन केली होती. जिथे जात, धर्म आणि लिंगाचा भेद न करता प्रत्येकाला आपले मत…

    Read More »
  • मी एक सच्चा भारतीय मुसलमान

    मुखेड प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ १२ मार्च २६ भारत ही केवळ एक जमीन नाही, तर ती आपल्या सर्वांची आई आहे.…

    Read More »
  • डिजिटल साखळदंड: आपण मोबाईलचे ‘स्मार्ट’ गुलाम झालो आहोत का?

    मुखेड प्रतिनिधी:- २१ फेब्रुवारी २१ व्या शतकात मानवाने केलेली सर्वात मोठी क्रांती म्हणजे ‘स्मार्टफोन‘. एका छोट्याशा उपकरणातसंपूर्ण जग सामावले आहे, ही कल्पनाच अद्भूत होती. पण आज, काही वर्षांनंतर, हेच साधन आपल्याप्रगतीचा मार्ग आहे की आपल्या अधोगतीचे कारण, हा प्रश्न विचारला जात आहे. “मोबाईलमुळे आपण गुलाम झालो आहोत का?” याचे उत्तर दुर्दैवाने ‘हो‘ कडे झुकताना दिसत आहे. १. ‘नोटिफिकेशन’चा अघोषित हुकूम पूर्वी गुलाम हे मालकाच्या एका आवाजावर धावत असत. आज आपल्या खिशातील मोबाईलची एक‘रिंग‘ किंवा ‘नोटिफिकेशन‘चा आवाज आपल्याला आपले महत्त्वाचे काम सोडून स्क्रीनकडे वळायलालावतो. मग ते काम जेवणाचे असो, अभ्यासाचे असो किंवा कोणाशी तरी महत्त्वाचे बोलण्याचे. आपणत्या एका आवाजाचे इतके गुलाम झालो आहोत की, तो आवाज आला नाही तरी आपण वारंवार मोबाईलतपासून पाहतो . ही मानसिक गुलामी नाही तर काय? २. वेळेची आणि एकाग्रतेची चोरी आज ‘रील‘ (Reels) आणि ‘शॉर्ट्स‘च्या जगात मानवी एकाग्रतेचा काळ कमालीचाघटला आहे. आपण तासनतास निरर्थक व्हिडिओ स्क्रोल करत बसतो. “फक्त दोन मिनिटे पाहतो” असंम्हणून सुरू झालेला प्रवास कधी दोन तासांत बदलतो, हे समजतही नाही. ही वेळ आपल्या स्वप्नांसाठी, छंदांसाठी किंवा कुटुंबासाठी वापरता आली असती, पण आपण ती ‘अल्गोरिदम‘च्या हवाली केली आहे. ही एका अर्थाने वेळेची चोरीच आहे.…

    Read More »
  • अल्पवयीन मुलांमधील मोबाईलचे व्यसन: एक वाढती चिंता

    मुखेड प्रतिनिधी:- २० फेब्रुवारी २६ संपादक:- आसद बल्खी आजच्या आधुनिक युगात मोबाईल फोन हा प्रत्येकाच्या हातातील अविभाज्य भाग बनला आहे. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वजण मोबाईलचा वापर करताना दिसतात. परंतु विशेष चिंतेची बाब म्हणजे अल्पवयातील मुले मोबाईलच्या व्यसनात अडकत चालली आहेत. ही समस्या केवळ कुटुंबा पुरती मर्यादित नसून समाजासाठीही धोकादायक ठरत आहे. लहान वयातील मुलांना सुरुवातीला मोबाईल खेळण्यासाठी किंवा व्हिडिओ पाहण्यासाठी दिला जातो. पालकांच्या दृष्टीने तो काही काळ शांत बसावा म्हणून हा सोपा उपाय असतो. पण हळूहळू ही सवयगरज बनते आणि नंतर व्यसनात रूपांतर होते. मोबाईलवरचे गेम्स, सोशल मीडियावरील व्हिडिओ, कार्टूनआणि विविध अॅप्स यामुळे मुलांचे लक्ष अभ्यासापासून दूर जाते. मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. सतत स्क्रीनकडेपाहिल्यामुळे डोळ्यांचे विकार वाढतात, झोपेचा त्रास होतो आणि डोकेदुखीची समस्या निर्माण होते. तसेचबाहेर खेळण्याची सवय कमी झाल्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात. मानसिकदृष्ट्याही मुलेचिडचिडी, एकलकोंडी आणि अस्वस्थ बनतात. मोबाईलच्या व्यसनामुळे कुटुंबातील संवादही कमी होतो. आई–वडील आणि मुलांमध्ये प्रत्यक्षसंवादाऐवजी स्क्रीनचा अडथळा उभा राहतो. मित्रांसोबत खेळण्याऐवजी मुलं आभासी जगात रमूलागतात. त्यामुळे त्यांच्या सामाजिक कौशल्यांवरही परिणाम होतो. या समस्येवर उपाय म्हणून पालकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. मुलांना ठराविक वेळेसाठीचमोबाईल वापरण्याची सवय लावावी. त्यांना मैदानी खेळ, वाचन, चित्रकला, संगीत यांसारख्याउपक्रमांकडे वळवावे. घरात मोबाईल–मुक्त वेळ निश्चित करणे, जसे की जेवणाच्या वेळी किंवाझोपण्यापूर्वी, हा एक चांगला उपाय ठरू शकतो. शेवटी, मोबाईल हा ज्ञान आणि मनोरंजनाचे साधन असला तरी त्याचा अतिरेक हानिकारक आहे. अल्पवयातील मुलांचे भविष्य उज्ज्वल ठेवायचे असेल तर त्यांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवणे हीसर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. योग्य मार्गदर्शन आणि प्रेमळ देखरेखीनेच आपण या समस्येवर मातकरू शकतो. ▫️पालकांनी काय करावे?…

    Read More »
  • उद्या जेष्ठ स्वातंत्र सैनिक डॉ. राजासिंह चौहान यांचे २५ वे पुण्यस्मरण दिन

    ▫️मुखेड पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते पहिले सभापती होते  मुखेड प्रतिनिधी:- ०८ जुलै २५ मुखेड येथील जेष्ठ स्वातंत्र सेनानी डॉ. राजासिंह हरिसिंह चौहाण यांचे दि. ०९ जुलै २०२५ रोजी २५ वेपुण्यस्मरण दिन साजरा होत आहे. हैद्राबाद मुक्ती संग्रामातील प्रमुख स्वामी रामानंद तीर्थ यांच्या समवेतत्यानी हैद्राबाद येथील निजाम रावटी विरोधात तीव्र लढा छेडला होता. आपल्या इतर सहकार्यासह घरावर तुळशीपत्र ठेवून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी जिवाची बाजी लावून प्राणपणाने लढणारे व्यक्तीमत्व म्हणून चौहाण यांची संबंध मराठवाड्यात ख्याती होती. डॉ. राजासिंह चौहाण यांचा जन्म मुखेड सारख्या डोंगराळ ग्रामीण भागात झाला. जातीने राजपुत असलेले डॉ. चौहाण हे केवळ त्या वेळेसची ७ वी पासहोते. पण त्यांनी आयुर्वेदिक उपचार पध्दती घेतली होती. सर्व लोकांना ते मोफत उपचार करत असत. त्यामुळे ते डॉ. म्हणून प्रसिध्द होते. डॉ. चौहाण हे मुखेड पंचायत समितीचे पहिले सभापती होने. त्यांनी हैद्रावाद…

    Read More »
Back to top button