क्रीडा

  • धक्कादायक: केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन

    केज | श्रमिक एकता न्यूज (प्रतिनिधी) ०९ एप्रिल २६ केज तालुक्याचे तरुण आणि कार्यक्षम तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी लातूर–अंबाजोगाई महामार्गावर झालेल्या एका भीषण कार अपघातात जागीच निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात आणि महसूल विभागात मोठी शोककळा पसरली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तहसीलदार राकेश गिड्डे हे आपल्या खाजगी कारने प्रवास करत होते. लातूर–अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. गाडी वेगात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, राकेश गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कारमध्ये ते एकटेच होते, अशी माहिती समोर येत आहे. राकेश गिड्डे यांची केज तालुक्यात एक कार्यक्षम आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारे अधिकारी म्हणून ओळख होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने महसूल प्रशासनाचे कधीही न भरून निघणारे नुकसान…

    Read More »
  • रस्ता ओलंडणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर दुचाकी धडकली; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    चांडोळा ते बोरगांव रस्त्यावर झाला अपघात मुखेड प्रतिनिधी  चांडोळा गावा पासून दोन कि.मी अंतरावर तळ्यातून माती घेऊन येणारा ट्रॅक्टर आणि दुचाकीची धडक होऊनभीषण अपघात झाला. या धडकेत एक जागेवर ठार झाला. तर इतर दोघांना डोक्यात जबर मार लागलाअसून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलविण्यात आले आहे. ही घटना दि. ९ एप्रिल रोजी सकाळी८.३० च्या दरम्यान झाली आहे. धनज गावातील मारोती राजेश घोडके (१७), मनीष राम वल्लेमवाड (१८), विवेक संतोष मानेकर (२०) हे तिघे आज सकाळी एमएससीआयटी संगणक कोर्ससाठी दुचाकीवरुन (क्र एम एच २६ X २५८६) मुखेडकडे येत होते. चांडोळा गावा जवळील तलावातून काळी माती घेऊन एक ट्रॅक्टर (क्र एम एच २६ बी एक्स ३२७८) अचानक मुख्य रस्त्यावर आला. त्यामुळे दुचाकीची व ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. यात मनीष उर्फ मनोजराम वल्लेमवाड याचा डोक्याला गंभीर मार लागल्याने जागेवरच मृत्यू झाला. तर मारोती घोडके याचा डावाहात फॅक्चर असून डोक्यात गंभीर दुखापत आहे. तसेच विवेक मानेकर यास डोक्यात गंभीर दुखापत झालीआहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर दोघांना डॉ. प्रकाश ठक्करवाड यांनी अधिक उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले.

    Read More »
  • मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्या संघामध्ये ओमप्रकाश मंडलेवाले यांची नुकतीच निवड 

    पुरुषांसह महिला संघाचाही समावेश मुखेड/प्रतिनिधी:-  ७२ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली आहे  नांदेड जिल्हा कबड्डी असोसिएशन संघात मुखेड तालुक्याचा सुपुत्र ओमप्रकाश मंडलेवाले  यांची ७२वी प्रॉड गट (पुरुष ) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५ मध्ये नुकतीच निवड करण्यात आली तो नांदेड जिल्हा कबड्डी…

    Read More »
  • विद्यार्थ्यांमध्ये मैदानी व सांघिक खेळाची गोडी लागावी म्हणून डॉ.श्रीहरी बुडगेमवार यांनी शाळेला दिले क्रिडा साहित्य भेट

    मुखेड /प्रतिनिधी:- मुखेड येथील सुप्रसिद्ध आध्या डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक तथा वैद्यकिय संस्थेचे सचिव डॉ.श्रीहरी राजाराम बुडगेमवार यांनी श्री संत मन्मथ…

    Read More »
  • व्हॉलिबॉलच्या महिला व पुरुष गटांमधे  सोहेल एलेवन मुखेड तर बँक ऑफ महाराष्ट्रा पुणे महिला संघ प्रथम

    मुखेड प्रतिनिधी:- मुखेड :- माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड यांच्या बाढदिवसा निमित्य मुखेड येथील जिल्हा परिषदहायस्कूल मुलींच्या शाळेच्या मैदानात तिन दिवसीय महिला व पुरुष गटांचे व्हॉलिबॉल सामने घेण्यात आलेया अटीतटीच्या सामण्यात सोहेल एलेवन मुखेड मुलांचा संघ व बँक ऑफ महाराष्ट्रा पुणे महिला संघ प्रथमक्रमांक मिळविला.  मुखेड येथे दि. २४ जानेवारी ते २६ जानेवारी दरम्यान व्हॉलिबॉलचे डे नाईट पद्धतीने सामने खेळवण्यातआले. या स्पर्धेत एकसे बढ़कर एक टिमांचा सहभाग घेतला होता. यात मुलींच्या संघातून ५१ हजाराचे प्रथमबक्षिस बँक ऑफ महाराष्ट्रा पुणे तर ३१ हजाराचे द्वितीय क्रमांकाचे बक्षिस लातूर स्पायकर लातूर या संघानेमिळविला. तर तृतीय क्रमांकाचे बक्षिस पोलीस संघ मुंबई ने मिळविले, तर उत्तेजनार्थ चौथा क्रमांकाचेबक्षिस महाराष्ट्र क्लब लातूर या संघाने मिळविले, तर मुलांच्या गटातुन ५१ हजाराचे प्रथम बक्षीस सोहेलएलेबन मुखेड संघाने मिळविले. तर द्वितीय क्रमांकाचे ३१ हजाराचे चक्षिस अमन क्लब बिड संघाने मिळविले. तर तृतीय क्रमांकाचे बक्षिस जि.जि. राठोड क्लब मुखेड संघाने मिळवले तर उत्तेजनार्थ चौथा क्रमांकरावनकोळा क्लब रावनकोळा या संघाने मिळविले. या स्पर्धेसाठी मुलांच्या गटासाठी प्रथम ५१ हजाराचेबक्षिस संजय रावनगावकर यांच्या वतीने देण्यात आले. तर ३१ हजाराचे व्दितिय क्रमांकाचे बक्षिस गंगाधरपिटलेवाड यांच्या वतीने देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे २१ हजाराचे बक्षिस माजी उपसभापती मारोतीफसकुलवाड यांच्या वतीने देण्यात आले. तर उत्तेजनार्थ ११ हजाराचे बक्षिस माजी नगरसेवक उत्तम बनसोडेयांच्या वतीने देण्यात आले. तर बेस्ट शुटर साठी ५ हजाराचे बक्षिस उमेश बनसोडे यांच्या वतीने, बेस्टलिफ्टर बिलास पाटील उमरदरिकर यांच्या वतीने देण्यात आले. तर मुलींच्या गटासाठी प्रथम क्रमांकाचे ५१हजाराचे बक्षीस राजकुमार बामने व गणेश पाटील बेळिकर यांच्या वतीने, द्वितीय क्रमांकाचे ३१ हजाराचेबक्षिस मनोज कांबळे सावरगावकर यांच्या वतीने तृतीय क्रमांकाचे २१ हजाराचे बक्षिस विनोद दंडलवाडयांच्या वतीने तर उत्तेजनार्थ ११ हजाराचे बक्षिस हाणमंत नरोटे यांच्या वतीने, प्रतिक गायकवाड यांनीकामगिरी केली.

    Read More »
  • म.ज्यो.फुले महाविद्यालयात नेहरू युवा केंद्राची तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वी

    मुखेडप्रतिनिधी :-येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग , क्रीडा विभाग आणि नेहरू युवा केंद्र , नांदेड यांच्या…

    Read More »
Back to top button