Uncategorized
-
नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपाचे अमरनाथ राजुरकर विजयी
▫️मतमोजणी शांततेत व सुरळीत संपन्न नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ 22 जून २६ महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या…
Read More » -
प्रभारी राजच्या विळख्यात मुखेड तालुका; विकासाचा गाडा रुतला;एकाच खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या
मुखेड (विशेष प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १७ जून २६ नांदेड जिल्ह्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेल्या मुखेड तालुक्यात सध्या प्रशासकीय अनागोंदीचा कळस गाठला गेला आहे. अनेक महत्त्वाच्या विभागांमधील प्रमुख पदे रिक्त असल्याने ‘प्रभारी राज‘ सुरू झाले असून, याचा थेट फटका तालुक्यातील विकासकामांना आणि सर्वसामान्य जनतेला बसत आहे. तालुक्यातील अनेक शासकीय अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत तर काहींची बदली झाली आहे. ही रिक्त पदे भरण्या ऐवजी शासनाने उपलब्ध अधिकाऱ्यांकडेच अतिरिक्त पदभार सोपवला आहे. आधीच एका विभागाचा डोलारा सांभाळताना दमछाक होत असलेल्या अधिकाऱ्यांकडे दुसऱ्या कार्यालयाची सूत्रे दिल्याने कोणत्याही एका विभागाला पूर्ण न्याय देता येत नाहीये. यामुळे प्रशासनाची कार्यक्षमता धोक्यात आली असून तातडीच्या निर्णयांना विलंब होत आहे. नांदेड जिल्ह्यातील एकमेव १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे आहे, मात्र येथील वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त आहे. डॉ. बालाजी आदमपूरकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार असल्याने आरोग्यव्यवस्थेवर ताण येत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता असताना पूर्णवेळ…
Read More » -
रुग्णसेवेचा वसा: ‘आध्या’ रुग्णालयातर्फे क्षयरोग, दमा आणि न्यूमोनियासाठी मोफत तपासणीशिबिराचे आयोजन
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ०७ जून २६ मुखेड येथील आध्या डायग्नोस्टिक सेंटरच्या ६ व्या वर्धापन दिनानिमित्त क्षयरोग (टीबी), दमा, न्यूमोनियाव श्वसनविकारांवरील मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर मंगळवार दि. ९ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. आध्या डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉ. श्रीहरी बुडगेमवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडणार आहे. या शिबिरात हैदराबादचे प्रख्यात फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉ. मन्नेम उपेंद्र कुमार यांची उपस्थिती राहणार असून रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिरामध्ये एलर्जी दमा, दीर्घकालीन खोकला, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, झोपेत घोरणे, फुफ्फुसांमध्ये पाणी भरणे, श्वसननलिकांचे आजार, टीबी, वारंवार सर्दी–खोकला तसेच धूम्रपान, बीडी, सिगारेट व तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांचे निदान व उपचाराबाबत सल्ला दिला जाणार आहे. विशेष म्हणजे शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांना औषधे, एक्स–रे व सीटी स्कॅनवर सवलत देण्यात येणार असून ईसीजी व मधुमेह तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे. नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक डॉ. श्रीहरी बुडगेमवार याच्यावतीने करण्यात आले आहे.
Read More » -
गॅस सिलिंडर घेऊन घरी परतताना काळाचा घाला; ‘छोटा हत्ती’च्या धडकेत मंग्याळ येथील पित्याचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर!
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ जून २६ मुखेड तालुक्यातील मंग्याळ येथील पिता–पुत्रांवर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना दि. २ जून रोजी घडली आहे. स्वयंपाकाचा गॅस संपल्याने नवीन गॅस सिलिंडर घेण्यासाठी मुखेडकडे आले व सदरील गॅससिलेंडर घेऊन जात असताना दुचाकी व छोटा हत्ती यांचा आमने–सामने झालेल्या अपघातात वडिलांचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंग्याळ येथील राहुल श्रावण सोनकांबळे (वय ४०) व त्यांचा मुलगा जितेंद्र राहुल सोनकांबळे (वय १५) हे दोघे मोटरसायकलने स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर घेण्यासाठी मुखेड येथे आले व गॅस सिलेंडर घेऊन गावाकडे जात असताना मुखेड जवळील दबडे शिरूर पाटी परिसरात त्यांच्या दुचाकीला एका छोटा हाती यांची जोरदार धडकबसली. या भीषण अपघातात राहुल सोनकांबळे गंभीर जखमी झाले. नागरिकांच्या मदतीने त्यांनातातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंतीत्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मंग्याळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात जखमी झालेला त्यांचा मुलगा जितेंद्र याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, जखमींवर उपचार करताना डॉ. उमाकांत गायकवाड, डॉ. शोभा देवकते, परिचारिका तुळशी नाईक व कदम सिस्टरयांनी तत्पर सेवा बजावली. या अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली. एका कुटुंबाचा आधारवड हरपल्याने मंग्याळ गावावर शोककळा पसरली असून जखमी मुलगालवकर बरा व्हावा यासाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू…
Read More » -
नांदेडमध्ये रविवारी मोठी दुर्घटना! नगीना घाटावर पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुरड्यांचा गोदावरी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू!!
▫️पाण्याचा अंदाज न आल्याने घडली काळाची भीषण झेप; साठे चौक परिसरावर पसरली शोककळा नांदेड प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ २४ मे २६…
Read More » -
वनविभाग निष्क्रिय, लाकूड तस्कर सक्रिय; मुखेडमध्ये अवैध वृक्षतोड वाढली
▫️जंगलांची सर्रास कत्तल, वनविभाग मात्र ‘मूकदर्शक’ मुखेड प्रतिनिधी:- ०५ मार्च २६मुखेड तालुक्यात अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करीचा प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना वनविभागमात्र अक्षरशः कोमात गेल्यासारखा निष्क्रिय दिसत आहे. वारंवार तक्रारी, बातम्या आणि स्थानिकनागरिकांचा आक्रोश असूनही या गंभीर प्रकाराकडे वनविभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मुखेड शहर सह तालुक्यातील बारहाळी, मुक्रमाबाद, जाहूर, राजूरा, आंबुलगा आणि…
Read More » -
“अंधश्रद्धेवर मात: गर्भवती मातेने ग्रहणकाळात भाजी चिरून जेवण केले”
▫️अंनिसचा ‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण‘ हा उपक्रम यशस्वी! पुणे:- ०४ मार्च २६ काल चंद्रग्रहणा निमित्त महाराष्ट्र निर्मूलन समितीने ‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण‘ हा अभिनव उपक्रम राबवला. ग्रहण काळात गर्भवती महिलांना ग्रहण पाळण्याची सक्ती केली जाते. त्यामध्ये गर्भवती महिलेने भाजीचिरू नये, कात्रीने काही कापू नये, नाहीतर बाळाचे ओठ फाटतात. अशी मोठी अंधश्रद्धा आज ही आपल्या समाजात आहे. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी नांदेड सिटी, सिंहगड रोड पुणे येथील सौ. चांदणीप्रफुल्ल थोरात या गर्भवती मातेने आज ग्रहण काळात भाजी चिरली, कात्रीने कागद कापले, जेवण केले. “ग्रहणात गरोदर स्त्रियांनी भाजी चिरली तर बाळाचे ओठ फाटतात” या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्याभ्रामक कल्पनेला आज सौ. चांदणी प्रफुल्ल थोरात या गर्भवती मातेने छेद दिला. आजच्या चंद्रग्रहणाच्याकाळात स्वतः या गरोदर मातेने भाजी चिरून, फळे खाऊन या जुनाट अंधश्रद्धेवर प्रहार केला. पुणे येथेग्रहणाचा वेध सुरू झालेवर, या गरोदर मातेने विविध भाज्या चिरल्या. “माझ्या होणाऱ्या बाळावरकोणत्याही अंधश्रद्धेचा नव्हे, तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संस्कार व्हावा, यासाठी मी हे धाडसी पाऊलउचलले आहे, या माझ्या छोट्या कृतीने गरोदर महिलांना अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यास बळ मिळेल अशीमला आशा आहे. तसेच माझे माहेरचे आणि सासरचे कुटुंबीय पुरोगामी आणि विज्ञानवादी असल्यामुळे मीहे धाडस करू शकले” असे मत सौ.चांदणी प्रफुल्ल थोरात यांनी यावेळी व्यक्त केले. सौ. चांदणी याअंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात यांच्या वहिनी आहेत. या उपक्रमाचे महत्त्व सांगताना अंनिस चे कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, “खगोलशास्त्रीय दृष्टीनेग्रहण ही केवळ सावल्यांचा खेळ असलेली एक खगोलीय घटना आहे. मात्र, आजही समाजातील मोठावर्ग, विशेषतः गरोदर महिलांना या काळात अनेक जाचक अंधश्रद्धा पाळण्याची सक्ती केली जाते. “भाजी चिरल्याने बाळाला इजा होते, ओठ फाटतात” या अंधश्रद्धेला कोणताही शास्त्रीय आधार नाही, हीअंधश्रद्धा दूर करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने हा ‘सोडा अंधश्रद्धेचे ग्रहण‘ हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. स्री रोग तज्ञ आणि खगोल अभ्यासक डॉ. संजय निटवे म्हणाले की, “बाळाचे ओठ फाटणे हे जनुकीयकारणांमुळे किंवा गर्भावस्थेतील पोषणाच्या अभावामुळे होते. त्याचा ग्रहणाशी किंवा भाजी चिरण्याशीदुरान्वयेही संबंध नाही.” महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्या डॉ. सविता अक्कोळे यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या ग्रहणा संबंधीभीतीदायक अफवांमुळे गरोदर महिला विनाकारण मानसिक तणावाखाली येतात. हा तणाव बाळासाठीघातक ठरू शकतो. त्यामुळे अशा फोल समजुतींना फाटा देऊन महिलांनी मुक्तपणे वावरावे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या अभिनव उपक्रमात सहभाग घेतलेल्या आणि ग्रहण काळातभाजी चिरून अंधश्रद्धा नाकारणाऱ्या सौ. चांदणी प्रफुल थोरात या गर्भवती मातेचे अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, श्रीपालललवाणी, अनिल वेल्हाळ यांनी कौतुक आणि अभिनंदन केले आहे.
Read More » -
मुखेड नगरपालिकेत राजकीय भूकंप: भाजप-शिवसेनेचे ७ नगरसेवक वादाच्या भोवऱ्यात!
▫️काँग्रेस आक्रमक; अपात्रतेसाठी जिल्हाधिकारी आणि न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार मुखेड (प्रतिनिधी): ०२ मार्च २६ मुखेड नगरपालिकेतील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून, सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या एकूण ७ नगरसेवकांनी बेकायदा मार्गाने निवडणूक जिंकल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी केला आहे. मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशसरचिटणीस डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी संबोधित केले. यावेळी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंदरीकर, शेकाप राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई आसद बल्खी यांची प्रमुख उपस्थिती होती डॉ. रॅपनवाड यांनी सांगितले की सक्षम पुराव्यांसह या नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी आता काँग्रेस रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढा देण्यास सज्ज झाली आहे ते ७…
Read More » -
देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले
नांदेड/प्रतिनिधी-12 फेब्रुवारी केंद्र व राज्य सरकारच्या कामगार, कर्मचारी, शेतकरी तसेच सर्वसामान्य जनतेच्या हिताला बाधा आणणार्या धोरणांविरोधात देशभरातील कामगार व शेतकरी…
Read More » -
मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू…
Read More »