क्राईम
-
अवैध रेती माफियांवर पोलिसांची कारवाई: ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पण ‘ही’ कारवाई फक्त एका दिवसापुरतीच का?
◽️मात्र रात्रंदिवस धावणाऱ्या असंख्य बेकायदेशीर टिप्परकडे दुर्लक्ष का? जनतेतून संतप्त सवाल श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- ०९ ऑगस्ट २६ मुखेड पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका हायवा टिप्परवर धडक कारवाईकरत तब्बल ४० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, या कारवाईनंतर पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “त्या दिवशी संपूर्ण तालुक्यात केवळ एकच गाडी रेतीची वाहतूक करत होती का?” असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. रात्रंदिवस राजरोसपणे सुरू असलेल्या असंख्य अवैध टिप्परकडे डोळेझाक करून केवळ एका दिवसापुरती केलेली ही कारवाई म्हणजे निव्वळ धूळफेक तर नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. सविस्तर वृत्त असे की, नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ रोजी नरसी ते मुखेड जाणाऱ्या रोडवर एका हायवा टिप्परमधून (क्र. MH-04-JU-0486) अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सदर वाहन अडवले आणि पाहणी केली असता, त्यामध्ये पाच ब्रास रेती आढळून आली. चालकाकडे रेती…
Read More » -
नांदेड भरदिवसा पेट्रोल पंपावर थरार: गँगवारमधून ३२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
▫️धनेगाव परिसरात खळबळ; दुचाकीवर पेट्रोल भरण्यासाठी आला असताना अज्ञातांचा हल्ला श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड:- ०८ ऑगस्ट २६ धनेगाव परिसरातील एका पेट्रोल पंपावर भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंदर सिंग बावरी (वय ३२) असे या मृत तरुणाचे नाव असून, ही हत्यागँगवार मधून (टोळीयुद्ध) झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. वर्दळीच्या ठिकाणी आणि भरदिवसा हा थरार घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इंदर सिंग बावरी हा आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी धनेगाव परिसरातील पेट्रोल पंपावर आला होता. तो पंपावर असतानाच अचानक तिथे आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर थेट जीवघेणा हल्ला चढवला. हा हल्ला इतका भयानक होता की, यात गंभीर जखमी झालेल्या इंदर सिंग बावरी याचा जागीच मृत्यू झाला. मृत इंदर सिंग बावरी हा मूळचा कौठा परिसरातील रहिवासी होता. या हत्ये मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या जुन्या वैमनस्यातून आणि गँगवार…
Read More » -
मुखेडमध्ये चिमुरड्यांच्या हाती वह्या-पुस्तकांऐवजी ‘गांजा-गुटखा’; पोलिसांच्या डोळ्यांदेखत सुरू आहे नशेचा काळाबाजार!
▫️अंधार पडताच ‘ही’ ठिकाणे बनतात नशेचे आणि अय्याशीचे अड्डे श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: १८ जुलै २६ मुखेड शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि पालकांची झोप उडवणारी परिस्थिती समोर आली आहे. शाळेत आणि कॉलेजमध्ये जाऊन भविष्य घडवण्याच्या वयात शहरातील अल्पवयीन मुले–मुली भयानक व्यसनांच्या विळख्यात अडकली आहेत. शहरात गांजा, गुटखा आणि इतर अमली पदार्थांचा सुळसुळाट झाला असून, प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे मुखेडची तरुण पिढी उघड्या डोळ्यांनी नशेच्या गर्तेतढकलली जात आहे.…
Read More » -
मुखेड पोलिसांची मोठी कारवाई: ३५.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त; अवैध वाळू आणि गुटखा माफियांवर धडक कारवाई
▫️३५ लाखांचा मुद्देमाल जप्त: पो.उप.नि. अभिजीत तुतूरवाड यांच्या माहितीवरून गुटख्यावर छापा, तर हायवा टिप्परही पकडला. श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : १२…
Read More » -
मुखेडमध्ये शेतकऱ्याची फसवणूक: ‘सफल गोल्ड’चे बियाणे बोगस? कृषी विभागाकडून पंचनाम्यास टाळाटाळ
▫️एकीकडे पावसाची दडी, त्यात बोगस बियाण्यांचा फटका! चांडोळा येथील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचेसंकट श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड :- १० जुलै २६ पावसाच्या लपंडावामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या माथी आता बोगस बियाणे मारलेजात असल्याचा संतापजनक प्रकार मुखेड तालुक्यात उघडकीस आला आहे. तालुक्यातील चांडोळा येथे तब्बल दोन एकरांवर (८० आर) पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यावर दुबारपेरणीचे संकट ओढवले आहे. कृषी विभागाकडे तक्रार करूनही पंचनाम्यासाठी चालढकल होत असल्याने शेतकऱ्याने आता थेट ग्राहक मंचाचा दरवाजा ठोठावण्याचा इशारा दिला आहे. नेमका प्रकार काय? चांडोळा येथील शेतकरी हनिफाबी निजामोद्दीन यांच्या मालकीच्या गट क्र. ९२१ मध्ये एकूण १ हेक्टर ७४ आर जमीन आहे. यापैकी ८० आर (दोन एकर) क्षेत्रात त्यांनी ३० जून रोजीमोठ्या आशेने ‘३३५ सफल गोल्ड‘ या कंपनीच्या सोयाबीन बियाण्याची पेरणी केली होती. मात्र, पेरणीला बरेच दिवस उलटूनही शेतात केवळ १० टक्केच बियाणे उगवले, तर ९० टक्के बियाणे मातीतच कुजूनगेले. या बोगस बियाण्यांमुळे ऐन खरीप हंगामात शेतकरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या फसवणुकीबाबत शेतकऱ्याच्या वतीने शेख चांदपाशा निजामोद्दीन यांनी मुखेड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि संबंधित बियाणे विक्रेत्या कृषी सेवा केंद्राकडे रीतसर तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार देऊनही कृषी विभागाचे कर्मचारी नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी टाळाटाळ आणि विलंबकरत आहेत. प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभारामुळे शेतकरी आणखीच चिंतेत सापडला आहे.…
Read More » -
मुखेड महसूल विभागातील ‘नशाबहाद्दर’ टीमचा हैदोस! मद्यधुंद अवस्थेत वाहनधारकांकडून अवैध वसुली
▫️कार्यक्षेत्राबाहेर जाऊन पैशांची मागणी; अश्लील शिवीगाळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल! श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड २७ जून २६ मुखेड तालुक्यात…
Read More » -
सत्तेचा माज! खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना भररस्त्यात जीवे मारण्याची धमकी; पोलिसांसमोरच उघड गुंडगिरी
▫️प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष भाई आसद बल्खी यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले पत्र!…
Read More » -
शंकरसागर जलाशयात माय-लेकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू; नांदेडजवळील विष्णुपूर येथील घटना
नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २१ जून २६ शहराशेजारीच असलेल्या विष्णुपुरी येथील शंकरसागर जलाशयात एक महिला आणि तिच्या तरुण मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोदावरी नदीच्या पात्रात या दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडालीआहे. मिळालेल्या माहितीनुसार, विष्णुपुरी भागातील प्रसिद्ध काळेश्वर मंदिर परिसराजवळ हा शंकरसागर जलाशय आहे. रविवार, दिनांक २१ जून रोजी या भागात दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांना जलाशयाच्या पात्रात एक महिला आणि एका तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. भाविकांनीया घटनेची माहिती तात्काळ नांदेड ग्रामीण पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यावर तरंगत असलेले महिला व तरुणाचे मृतदेह सुखरूप पात्राबाहेर काढले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या काही वेळातच दोन्ही मृतदेहांची ओळख पटवण्यात यश मिळवले. हे मृतदेह संगवाबाई कळसकर (वय…
Read More » -
नांदेड पुन्हा रक्ताळले! पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणावर थरारक गोळीबार; शहरात प्रचंड खळबळ
नांदेड (विशेष प्रतिनिधी) : श्रमिक एकता न्यूज़ २१ जून २६ शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाही धाक उरलेला नाही, हे सिद्ध करणारी आणखी एक थरारक आणि अत्यंत दुर्दैवी घटना नांदेड मध्ये घडली आहे. खडकपुरा भागातील रहिवासी शेख शमीम शेख इसाक (वय ४२) यांची अज्ञात हल्लेखोरांनी मध्यरात्री अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहर पुन्हा एकदा हादरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.…
Read More » -
मुखेडमध्ये अवैध धंद्यांवर पोलिसांचा हातोडा! १३ हजारांची रोकड आणि ८ दुचाकी जप्त; ८ जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल
◽️सूतगिरणीच्या पाठीमागे रंगला होता डाव; मुखेड पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई! मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १८ जून २६ तालुक्यातील अवैध धंद्यांविरुद्ध मुखेड पोलिसांनी अत्यंत कडक पाऊल उचलत एक मोठी कारवाई केली आहे. मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरब खंडगाव येथे सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडसी छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी ८ जुगाऱ्यांना रंगेहात पकडत त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटना स्थळावरून जुगाराचे साहित्य, १३ हजारांची रोकड आणि तब्बल ५ लाख ३० हजार रुपये किमतीच्या ८ मोटारसायकली असाएकूण ५ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…
Read More »