सामाजिक
-
जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावे यासाठी मुखेड अभिवक्ता संघाचे तहसिलदारांना निवेदन!
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : ०८ ऑगस्ट २६ जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी दाखल केलेले अर्ज दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्याने नागरिकांना मोठ्या…
Read More » -
लेंडी प्रकल्पग्रस्तांचा शासनाला थेट इशारा: प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास १८ ऑगस्टला घेणार जलसमाधी!
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड :- ०७ ऑगस्ट २६ लेंडी मध्यम प्रकल्पामुळे बाधित झालेल्या हसनाळ आणि परिसरातील नागरिकांनी शासनाच्या उदासीन धोरणाचा तीव्र निषेध करत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रशासनाला शेकडो निवेदने देऊनही पदरी निराशाच पडत असल्याने, मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास येत्या १८ ऑगस्ट २०२६ रोजी थेट धरणात ‘जलसमाधी’ घेण्याचा अल्टिमेटम प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. शासनाने “आधी पुनर्वसन, मग धरण” हे धोरण राबवणे बंधनकारक असतानाही, पुनर्वसन पूर्ण नकरताच धरणात पाणीसाठा (गळभरणी) करण्यास परवानगी कशी दिली? याची स्वतंत्र व निष्पक्ष…
Read More » -
हृदयद्रावक! बियाण्यांसाठी ठेवलेले कीटकनाशक ठरले काळ; विषारी प्रभावाने दोन सख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी अंत
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क धर्माबाद :- ०६ ऑगस्ट २६ हरभरा बियाण्याला कीड लागू नये म्हणून घरात साठवून ठेवलेल्या कीटकनाशकाच्या विषारी…
Read More » -
मुखेड ‘महिला बाल कल्याण’ प्रकल्प कार्यालयाचीच दुरवस्था: गळके छत, चिखलाचे साम्राज्य आणिशौचालया अभावी महिलांची कुचंबणा!
▫️गळके छत आणि कार्यालयात बादल्या ठेवण्याची वेळ श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड :-३ ऑगस्ट २६ एकीकडे शासन ‘स्वच्छ भारत‘, ‘महिला सन्मान‘ आणि सक्षमीकरणाच्या मोठ्या गप्पा मारते, तर दुसरीकडे महिलांच्या हितासाठीच स्थापन झालेल्या ‘महिला बाल कल्याण विभागा‘च्या मुखेड प्रकल्पकार्यालयात महिला कर्मचाऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. कार्यालयाला गळती लागली आहे, जाण्यासाठी धड रस्ता नाही आणि सर्वात संतापजनक बाब म्हणजे कार्यालयात साधं शौचालय नसल्याने शेकडो अंगणवाडी सेविका आणि महिला कर्मचाऱ्यांना नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर बसावे लागतआहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचे आणि दुरवस्थेचे विदारक वास्तव छाया चित्रांमधून समोर आले…
Read More » -
फुलवळ नदीच्या पुलावर दुचाकीचा भीषण अपघात; नगारवाडी येथील युवकाचा जागीच मृत्यू
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क फुलवळ/कंधार: ३० जुलै २६ कंधार तालुक्यातील फुलवळ येथील नदीच्या पुलावर आज एक अत्यंत भीषण अपघात झाला.…
Read More » -
शाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त नांदेडमध्ये शांतता समितीची बैठक; शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे पोलिसांचे आवाहन
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड: ३० जुलै २६ शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त नांदेड शहरात आयोजित विविध कार्यक्रम, मिरवणुका आणि इतर कार्यक्रमांसाठी शांततापूर्ण, सुरक्षित आणि उत्साहाचे वातावरण सुनिश्चित करण्याकरिता मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मंथन हॉलमध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षस्थान पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी भूषवले. या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी (नांदेड शहर) रामेश्वर वांजणे, शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी, नांदेड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्तगिरीश कदम, समाजकल्याण विभाग, आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध सरकारी विभागांचे अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, सामाजिक संघटनांचे अधिकारी, अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समित्यांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सभेला संबोधित करताना पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांच्या आदर्शांपासून प्रेरणा घेऊन, जयंती सोहळा सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याच्या वातावरणात साजरा केला पाहिजे. त्यांनी सर्व आयोजक आणि नागरिकांना आवाहन केले की, कायदा…
Read More » -
सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प! रोटरी क्लब मुखेड सिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न.
डॉ. श्रीहरी बुडगेमवार अध्यक्ष तर पवन पोतदार सचिवपदी श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड : २९ जुलै २६ मुखेड येथे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या ‘रोटरी क्लब मुखेड सिटी‘चानवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच शाही थाटात आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात डॉ. श्रीहरी बुडगेमवार यांनी नूतन अध्यक्षपदाची तर पवनपोतदार यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. या दिमाखदार सोहळ्याची सुरुवात वृक्षाला पाणी देऊन करण्यात आली, ज्यातून क्लबचापर्यावरणाप्रती असलेला दृष्टिकोन आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली. हरिभक्त पारायण नामदेव महाराज दापकेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पदग्रहण सोहळा पार पडला.…
Read More » -
रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटीच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीहरी बुडगेमवार; आज पदग्रहण सोहळा
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: २८ जुलै २६ ‘रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटी’च्या नूतन कार्यकारिणीचा (वर्ष २०२६-२७) पदग्रहण सोहळा आज,…
Read More » -
९ ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा: मुखेडमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
▫️नांदेड येथे होणाऱ्या महामोर्चात मुखेड तालुक्यातून हजारो समाज बांधव सहभागी होणार श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: २७ जुलै २६ अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध दर्शवण्यासाठी येत्या ९ ऑगस्ट रोजी नांदेड येथे एका विशाल ‘महामोर्चा‘चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीच्या…
Read More » -
जाहुर कब्रस्तान मोजणी प्रकरण: वक्फ कमिटीच्या आमरण उपोषणाचा ६ वा दिवस; राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेचा आंदोलनाला पाठिंबा
श्रमिक एकता न्यूज नेटवर्क, देगलूर: २६ जुलै २०२६ देगलूर: मौजे जाहुर (ता. मुखेड, जि. नांदेड) येथील मुस्लिम कब्रस्तानच्या शासकीय मोजणीतजाणीवपूर्वक अडथळा आणणाऱ्या व्यक्तींवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीनेकठोर कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी ‘वक्फ संस्था ग्रेव्हयार्ड (कब्रस्तान)’ समितीच्या वतीने देगलूर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा ६ वा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी दि २५ जुलै रोजी ‘राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद‘ या सामाजिक संघटनेच्या वतीनेउपोषणस्थळी भेट देण्यात आली. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सामाजिककार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी अब्दुल बशीर माजिद (मराठवाडा अध्यक्ष)राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद, पत्रकार महेताब शेख(जिल्हाध्यक्ष),कॉम्रेड गौस अली मामू सलगरकर (ज्येष्ठ समाजसेवक),भाई आसद बल्खी(तालुकाध्यक्ष),…
Read More »