राजकीय
-
संजय गांधी, श्रावणबाळ व दिव्यांग योजनांचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करा! :- मुखेड काँग्रेसची मागणी
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: ७ ऑगस्ट २६ संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि दिव्यांग योजनांचे प्रलंबित असलेले प्रस्ताव प्रशासनाने तात्काळ मंजूर करून लाभार्थ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी मुखेड तालुका आणि शहरकाँग्रेस कमिटीच्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी आणि मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. सर्वसामान्यांना आणि गरजूंना आर्थिक आधार देणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या योजना आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून या योजनांचे अनेक प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहेत. यामुळे वृद्ध, निराधार आणि दिव्यांग नागरिकांना अनुदाना पासून वंचित राहावे लागत असून, त्यांना नाहक आर्थिक वमानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन प्रलंबित प्रस्तावांची लवकरात लवकर छाननी करावी आणि ते मंजूर करावेत, अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने या निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन देते वेळी प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. श्रावण रॅपणवाड, काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर, ओबीसी नेते विश्वनाथराव कोलमकर, तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील आरगीळे, ओबीसी काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड, काँग्रेस शहर उपाध्यक्ष बालाजी वाडेकर, युवक काँग्रेस उपाध्यक्ष एम. आर. गोपणर आणि राजुभाऊ बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.…
Read More » -
जीर्ण अंगणवाड्यांच्या जागी नवीन इमारती मंजूर करा; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची गट विकास अधिकाऱ्यांकडे मागणी
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नायगाव ०६ ऑगस्ट २६ मांजरम येथील सर्व अंगणवाड्यांचे तातडीने सर्वेक्षण करून तेथील जीर्ण झालेल्या इमारतींच्या जागी नवीन इमारती मंजूर कराव्यात, तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य, खेळणी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नायगावचे गट विकास अधिकारी. वानखेडे यांना निवेदन दिले. यासोबतच, तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून थकीत असलेले हप्ते व बिले तात्काळ त्यांच्या खात्यावर अदा करण्यात यावीत, अशीही मागणी पांडुरंग शिंदे यांनी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी वानखेडे यांच्याकडे लावून धरली. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस किरण वाघमारे, व्यंकट अण्णा शिंदे, विश्नभर शिंदे, मधुकर शिंदे, गणेश वाघमारे, रोहिदास नव्हारे आणि काशिनाथ बाळापुरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More » -
युवा शक्तीच्या जोरावरच ‘रासप’ राज्यात मोठी ताकद बनेल: युवा प्रदेशाध्यक्ष अजित पाटील
▫️रासपची युवा संवाद बैठक संपन्न; आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबुतीचा एकमुखी संकल्प श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड :- ०५ ऑगस्ट २६…
Read More » -
शेतकरी नेते राकेश टिकैत ५ ऑगस्टला नांदेडमध्ये; ‘भारत-अमेरिका व्यापारी करारावर’ करणार मार्गदर्शन
श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड: ०४ ऑगस्ट २६ संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख राष्ट्रीय नेते. राकेश टिकैत हे ५ ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून, ते एका विशेष शेतकरी मेळाव्यात भारत–अमेरिका व्यापारी करारा बाबत (ट्रेड डील) मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळावा शहरातील शंकरराव चव्हाण सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. देशभरात सध्या ‘भारत–अमेरिका ट्रेड डील‘बाबत मोठी चर्चा सुरू असून, या कराराचे देशावर आणि विशेषतः शेती क्षेत्रावर काय परिणाम होतील, याविषयी जनजागृती करण्यासाठी राकेश टिकैत हे संपूर्ण देशभरात मोहीम राबवत आहेत. या मोहिमेचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये या विशेष शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११…
Read More » -
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुखेड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी!
▫️सरकारने दखल न घेतल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांचा इशारा श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : २१ जुलै २६…
Read More » -
वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुखेडमध्ये समविचारी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या बैठकीचे आयोजन
▫️सोनम वांगचुक मृत्यूशी झुंज देतायत, मात्र सरकार बघ्याच्या भूमिकेत! ▫️आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : १६…
Read More » -
जनतेचे प्रश्न ऐरणीवर; महाराष्ट्रात मात्र नेत्यांचा सत्तेचा घोडेबाजार जोरात! बळीराजा, तरुण आणि सामान्य जनता वाऱ्यावर
▫️बळीराजा हवालदिल; शेतकऱ्यावर दुष्काळाचे सावट! ▫️पदव्या हातात, पण काम नाही; तरुण रोजगारासाठी वणवण! मुखेड विशेष प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १७…
Read More » -
ठाकरे गटात मोठा भूकंप! ‘ऑपरेशन टायगर’मुळे ६ खासदारांचे बंड; संजय राऊतांचा संताप अनावर, शिवराळ भाषेत हल्लाबोल
मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १७ जून २६ गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेले ‘ऑपरेशन टायगर’ आता अंतिम टप्प्यात आले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला लोकसभेत फार मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘मशाल‘ चिन्हावर निवडून आलेल्या ९ खासदारां पैकी तब्बल ६ खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचे वृत्त समोर आले आहे. येत्या १९ जूनला, म्हणजेच शिवसेनेच्या वर्धापन दिनी हेबंडखोर खासदार आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत, लोकसभेचे गटनेते अरविंद…
Read More » -
नांदेडात काळ्या पाण्याची शिक्षा, गोव्यात नगरसेवकांची ‘मौज’; लोकशाहीची लाज वेशीवर टांगली!
नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १५ जून २६ “जनतेने मत दिलंय ना? मग आता मरा घाणीच्या पाण्यात!” बहुदा नांदेडच्या नगरसेवकांचा जनतेकडे बघण्याचा दृष्टिकोन हाच असावा, असे चित्र सध्या नांदेड शहरात पाहायला मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या गणितात गुंग झालेले आणि स्वतःला ‘जनतेचे सेवक‘ म्हणवून घेणारे नगरसेवक सध्या गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर निळ्या पाण्याच्या लाटांवर स्वार झाले आहेत; तर दुसरीकडे त्यांनीच वाऱ्यावर सोडलेली नांदेडची जनता नळातून येणाऱ्या गटारीच्या काळ्या आणि दुर्गंधीयुक्त पाण्याशी जीवघेणा संघर्ष करत आहे. नांदेड शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नळाला पाणी नाही, तर थेट गटारीचा चिखल येत आहे. लहान मुले, वृद्ध आणि रुग्ण याच दूषित पाण्यामुळे आजाराच्या उंबरठ्यावर उभे आहेत. अनेक कुटुंबांना विकतचे पाणी घेण्याची किंवा आरोग्याशी तडजोड करण्याची वेळ आली आहे. महापालिका आणि पाणीपुरवठा विभाग कुंभकर्णी झोपेत आहे आणि लोकप्रतिनिधींना या नरकयातनेची साधी लाजही उरलेली नाही, असा तीव्र संताप नागरिक व्यक्त करत आहेत. शहरात पाण्याचा हाहाकार माजलेला असताना, विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुतांश नगरसेवकांना ‘फाइव्ह स्टार‘ सहलीवर (टूर) रवाना करण्यात आले आहे. गोवा आणि कोकणातील आलिशान हॉटेल्समध्ये हे लोकप्रतिनिधी जनतेच्या पैशांवर मौजमजाकरत असल्याची जोरदार चर्चा आहे. या संतापजनक परिस्थितीवर नांदेडकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट हल्ला चढवला आहे. सध्या फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर “प्रभागात…
Read More » -
Nanded MLC Election: …तर नगरसेवकांना इच्छेविरुद्ध डांबून ठेवलंय? ‘वंचित’च्या उमेदवाराचा गंभीर आरोप; नांदेडच्या राजकारणात खळबळ!
▫️वंचित बहुजन आघाडीची निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे यांच्याकडे धाव नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १३ जून २६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा थरार शिगेला पोहोचला असतानाच, नांदेडच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि नांदेड–वाघाळा महापालिकेचे गटनेते इंजि. प्रशांत इंगोले यांनी मतदारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, निवडणूक निरीक्षकांकडे धाव घेतली आहे. जिल्ह्यातील अनेक नगरसेवक संशयास्पदरित्या गायब असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इंजि. प्रशांत इंगोले यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, प्रचारासाठी नांदेड–वाघाळा मनपा वजिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगरपरिषदांमधील मतदार नगरसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नकेला. मात्र मोठ्या संख्येने नगरसेवकांचे मोबाईल बंद किंवा ‘नॉट रिचेबल‘ लागत आहेत. प्रत्यक्षभेटीसाठी गेल्यानंतरही ते उपलब्ध झाले नाहीत. लोकशाही प्रक्रियेत मतदारांनी सक्रिय सहभाग घेणेअपेक्षित असताना त्यांची मोठ्या प्रमाणावर अनुपस्थिती अनेक शंका निर्माण करणारी आहे. मागीलकाही निवडणुकांमध्ये राजकीय दबाव, प्रलोभनाने निवडणुकांवर प्रभाव टाकल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे मतदारांना इच्छेविरुद्ध एका ठिकाणी ठेवण्यात आले आहे का, त्यांच्यावर दबाव आहे का, याचीनिष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे, असे इंगोले यांनी पत्रात नमूद केले आहे. सदरच्या प्रकाराबाबत यंत्रणांमार्फत तातडीने चौकशी करावी. मतदार नगरसेवकांची सुरक्षितता वमतदानाचे स्वातंत्र्य सुनिश्चित करावे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पारपाडावी. अशी मागणी निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे यांचेकडे इंगोले यांनी केली आहे. निवडणुकीच्या अगदी तोंडावर नगरसेवकांचे ‘नॉट रिचेबल‘ होणे ही प्रशासनाची डोकेदुखी वाढवणारी बाब ठरत आहे. सर्व मतदारांना कोणत्याही भीतीशिवाय आणि दबावा शिवाय मतदान करता येईल, असेभयमुक्त वातावरण निर्माण करण्याचे मोठे आव्हान आता निवडणूक आयोगासमोर असणार आहे. यातक्रारीनंतर आता प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read More »