शैक्षणिक

  • शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार! मसलगा जि. प. शाळेची छत गळती; विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ, अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण?

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मसलगा/कंधार) :३० जुलै २६  कंधार तालुक्यातील मसलगा येथील जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दुरवस्था झाली असून, पावसाचे…

    Read More »
  • टिईटी परीक्षा घोटाळ्यांविरोधात नांदेडमध्ये एसएफआयचे आंदोलन

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड : ०६ जुलै २६ ‘नीट’ व ‘टीईटी’ परीक्षा घोटाळ्यांच्या निषेधार्थ एसएफआय जिल्हा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी…

    Read More »
  • विद्यार्थ्यांची लूट आणि टी.सी. अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई करा!

    ▫️’एसएफआय‘ (SFI) नांदेड जिल्हा कमिटीचे समाज कल्याण विभागाला निवेदन! ​नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ ११ जून २६ नाव नोंदणी आणि पुढील प्रवेशाचा काळ सुरू असतानाच, जिल्ह्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांची क्रूर थट्टा केली जात आहे. दरवर्षी समाज कल्याण विभागा मार्फत मिळणारी शिष्यवृत्ती वेळेवर जमा न झाल्याचे कारण पुढे करत, अनेक महाविद्यालये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांची टी.सी. (दाखला) रोखून धरत आहेत. ‘पूर्ण कॉलेज फी भरल्याशिवाय टी.सी. मिळणार नाही‘ अशी बेकायदेशीर भूमिका घेत विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे, तसेच टी.सी. देण्यासाठी बेकायदेशीर पैशांची ( अतिरिक्त शुल्क) उघडपणे मागणी होत आहे. यामुळे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचेपुढील शिक्षण धोक्यात आले आहे. ​या गंभीर समस्येची दखल घेत आज स्टूडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीनेमा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, नांदेड यांना निवेदन देवून कारवाई करण्याची मागणी…

    Read More »
  • हिमायतनगरची सुकन्या सबीना खानम १२ वी च्या परीक्षेत तालुक्यात प्रथम; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

    ▫️हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाचा झेंडा फडकला; ७३.६७ टक्के गुण मिळवून मिळविले यश हिमायतनगर प्रतिनिधी – अजीम हिंदुस्तानी): २ मे २६ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १२ वी च्यापरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील…

    Read More »
  • शाळांच्या फी दरवाढीला बसणार लगाम; विभागीय शुल्क नियामक समिती गठीत

    पुणे (विशेष प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ २१ एप्रिल २६ महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ नुसार, पुणे विभागासाठी बहुप्रतिक्षित‘विभागीय शुल्क नियामक समिती’ अखेर गठीत करण्यात आली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने १७ एप्रिल २०२६ रोजी यासंदर्भात अधिकृत पत्र निर्गमित केले असून, यामुळे खासगी शाळांच्या अव्वाच्या सव्वा फी दरवाढीवर आता प्रशासनाचे नियंत्रण येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या २३ मार्च २०२६ च्या राजपत्रानुसार प्राप्त अधिकारांचा वापर करून या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये खालीलप्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या आहेत श्री. एस. एस. गुल्हाणे (सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश) अध्यक्ष प्रादेशिक शिक्षण…

    Read More »
  • प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचा १४ कोटींचा निधी परत; दोषींवर कारवाई करा!

    ▫️शिक्षक परिषदेची पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे आक्रमक मागणी; निधी पुन्हा मिळवून देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १९ एप्रिल…

    Read More »
  • आरटीई प्रवेशित विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्यास शाळांवर होणार कारवाई; राज्य सरकारचा मोठा निर्णय

    मुंबई: श्रमिक एकता न्यूज़ २५ मार्च २६ शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क, पुस्तके, गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली पैसे घेता येणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारने सर्व शाळांना दिले आहेत. अनेक खासगी शाळा आरटीई अंतर्गत प्रवेश देऊनही पालकांकडे विविध शुल्काची मागणी करत असल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. शासनाच्या या आदेशामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांच्या पाल्यांचे शिक्षण आता खऱ्या अर्थाने मोफत होणार आहे. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या संदर्भात शाळांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेआहेत. “आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेले विद्यार्थी हे नियमानुसार मोफत शिक्षणास पात्र आहेत. जर एखादी शाळा या विद्यार्थ्यांकडून पुस्तके, गणवेश किंवा इतर कोणत्याही साहित्यासाठी पैशांची मागणी करत असेल, तर ते नियमांचे उल्लंघन मानले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची गय केली जाणार नाही. ज्या शाळा पालकांकडून…

    Read More »
  • हायकोर्टाचा मोठा दिलासा! आरटीई प्रवेशाला मुदतवाढ, जुन्याच नियमांनुसार प्रक्रिया

    मुखेड प्रतिनिधी:- १० मार्च २६ शिक्षण हक्क कायद्यांतर्गत अर्थात आरटीई द्वारे शाळा प्रवेशासाठी १ किमीच्या अटीला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं स्थगिती दिली असून पूर्वीच्या नियमांप्रमाणेच प्रवेश देण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. आज आरटीई अंतर्गत अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती ती देखील पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. आरटीई अंतर्गत शाळा प्रवेशांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख होती. सरकारनं यंदा या कायद्यात नवी नियमावली लागू करत पूर्वीच्या ३ किमी ऐवजी १ किमीच्या परिसरातीलच शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल असे आदेश काढले होते. याविरोधात पालकांनी तीव्र विरोध केला, त्याअनुषंगानं नागपूरच्या खंडपीठात याविरोधात याचिका देखील झाल्या. या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेत काल खंडपीठानं या १ किमीच्या अटीला स्थगिती दिली. ‏दरम्यान, आजच्या सुनावणीत खंडपीठानं आजची प्रवेशाची शेवटची तारीखही पुढे ढकलली. तसंचआरटीईच्या ऑनलाईन पोर्टलवर १ किमीचा नियम काढून पूर्वीप्रमाणे ३ किमीचा नियम अपडेट करण्यासाठी १२ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पोर्टलवर हे अपडेशन झाल्यानंतरच आरटीई अंतर्गत ऑनलाईन नोंदणीच्या प्रवेश प्रक्रियेचा कालावधी सरकारने जाहीर करावा, असे आदेश नागपूरखंडपीठानं दिले आहेत. यामुळं १ किमीच्या अटीमुळे ज्या विद्यार्थ्यांना शाळा उपलब्ध नसल्यानं नोंदणी होऊ शकली नाही अशा लाखो विद्यार्थ्यांना यामुळं दिलासा मिळाला आहे. आरटीई अंतर्गत एक किलोमीटरच्या अटी विरोधात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात अॅड. दीपकचटप, अॅड. बोधी रामटेके यांच्यासह आशिष फुलझेले आणि अनिकेत कुत्तरमरे यांनी दोन वेगवेगळ्या…

    Read More »
  • मुखेडात शिष्यवृत्ती परीक्षेत ‘सावळा गोंधळ’; मराठीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी तर इंग्रजीच्यांना मराठीचे पेपर!

    मुखेड (प्रतिनिधी): २३ फेब्रुवारी २६ दि २२ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मुखेड येथील परीक्षा केंद्रावरप्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला आहे. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे, तरइंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीचे पेपर वाटप झाल्याने परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. याप्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नेमका प्रकार काय? मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षा सुरू होताच पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप केले. मात्र, काही वेळातच विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की, त्यांना त्यांच्या माध्यमाचे पेपर मिळालेले नाहीत. मराठीमाध्यमाच्या वर्गात इंग्रजीचे पेपर गेले, तर सेमी–इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीमाध्यमाच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. ही चूक लक्षात येईपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. १५ मिनिटे उशिरा मिळाले पेपर हा गोंधळ निस्तरताना आणि योग्य प्रश्नपत्रिकांची जुळवाजुळव करताना परीक्षेच्या वेळेतील तब्बल १५ मिनिटे…

    Read More »
  • प्रशासनाच्या कडक निगराणीत नरसिंह विद्यामंदिर उमरदरी केंद्रावर शालांत परीक्षा सुरळीत

    मुखेड: प्रतिनिधी २२ फेब्रुवारी २६ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी माध्यमिक शालांतप्रमाणपत्र इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा सध्या सर्वत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, जनता शिक्षण प्रसारकमंडळ नरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथील परीक्षा केंद्रावर प्रशासनाच्या कडक निगराणीत आणि शिस्तबद्ध वातावरणात परीक्षा अत्यंत सुरळीतपणे पार पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘कॉपीमुक्त अभियान‘ अंतर्गत उमरदरी केंद्रावर विशेष खबरदारी घेतलीजात आहे. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्र संचालक आणिपर्यवेक्षकांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची कसून तपासणीकेल्यानंतरच त्यांना परीक्षा दालनात प्रवेश दिला जात आहे. विश्वासनीय सुत्रांकडून सांगण्यात आले की काही असामाजिक तत्त्वांद्वारे व शाळेतील हकालपट्टी केलेल्या एका माजी मुख्याध्यापकाला हाताशी धरून खंडणीखोर तोतया पत्रकार हा या केंद्रावर मोठ्यारकमा घेऊन परीक्षा केंद्रावर काॅपी चालवण्यासाठी आटापिटा करत कर्मचाऱ्यांवर दबाव आणत होता पण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी कुठलाही दबाव न  घेता पोलिस आणि शिक्षण खात्यातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची मदत घेऊन संबंधितांचे गैरकारभार करण्याचे मनसुबे उधळून लावले आहेत.सदरील परीक्षा सिसिटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत सुरू असल्यामुळे शिक्ष  विभागातील अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच प्रशासनाच्या नियोजनामुळे पालकांनी समाधान व्यक्त…

    Read More »
Back to top button