आरोग्य
-
दर्पण दिनानिमित्त आज पत्रकार बांधवाची आरोग्य तपासणी शिबिर
६ जानेवारीला विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व विविध कार्यक्रमाचे आयोजन मुखेड, (प्रतिनिधी)- प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी मुखेड येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सल्गणीत मुखेड तालुकामराठी पत्रकार संघाच्या वतीने दि.४ ते ६ जानेवारी या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेअसुन आज दि.४ जानेवारी रोजी आयएमए संघटना, वैद्यकीय संस्था व मुखेड उपजिल्हा रूग्णालय यांच्यासंयुक्त विद्यमाने सर्व पत्रकार बांधवाची आरोग्य तपासणी उपजिल्हा रूग्णालयात करण्यात येणार आहे. तसेच ६ जानेवारी रोजी रुग्णांना फळे व विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. दर्पण दिनाचे अवचित्य साधुन आज ४ जानेवारी रोजी सकाळी ०९ वाजता वैद्यकीय संस्था, आय एमएसंघटना व उपजिल्हा रुग्णलाय यांच्या वतीने सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनकरण्यात आले असुन यात रक्त च्या सर्व तपासणी मधुमेह चाचणी, कोलेस्ट्रॉल रक्तदाब, हृदयरोग बाबतीतआवश्यक चाचणी, नेत्र तपासणी, हाड सांधे दुखी तपासणी, दंतरोग तपासणी, वजन, बीएमआय, शुगर, बीपी, एक्सरे अशा सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीजागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य मुखेडभुषण डॉ. दिलीप पुंडे हे राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणुनआयएमए संघटनेचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध – हदयरोगतज्ञ डॉ. अशोक कौरवार, उपजिल्हा रुग्णालयाचेवैद्यकिय अधीक्षक डॉ. संतोष टाकसाळे, वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. रामराम श्रिरामे, डॉ व्यंकटराव सुभेदारभोसले, डॉ. महेश पतेवार, आयएमए संघटनेचे सचिव डॉ. कैलास पाटील चांडोळकर, वैद्यकीय संस्थेचेसचिव डॉ. श्रिहरी बुडगेमवार, दंतरोगतज्ञ डॉ पांडुरंग श्रीरामे यासह अनेक मान्यवर तज्ञ डॉक्टरांची उपस्थितीराहणार आहे. यावेळी पत्रकारांची आरोग्य तपासणी वैद्यकीय संस्था, आयएमए संघटना व मुखेड उपजिल्हारुग्णलायातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत होणार आहे. त्याचबरोबर ०६ जानेवारी रोजी दर्पण दिन्नानिमित्तसकाळी १० वाजता मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्वं सामान्य, गोरगरीब नागरिकांच्यापाल्याला, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही, पेन, शॉपनर, खोडरबर पुस्तके वाटप करण्यात येणार आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहे तरी या विविध कार्यक्रमास पत्रकारबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अ.भा. मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Read More » -
हदगाव शहरात 18 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही
तंबाखू विक्रेत्यांना 8 हजार 500 रुपयांचा दंड आकारला …
Read More »