Sharmik Ekta

  • क्राईम

    अवैध रेती माफियांवर पोलिसांची कारवाई: ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पण ‘ही’ कारवाई फक्त एका दिवसापुरतीच का?

    ◽️मात्र रात्रंदिवस धावणाऱ्या असंख्य बेकायदेशीर टिप्परकडे दुर्लक्ष का? जनतेतून संतप्त सवाल श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड:- ०९ ऑगस्ट २६  मुखेड पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एका हायवा टिप्परवर धडक कारवाईकरत तब्बल ४० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, या कारवाईनंतर पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “त्या दिवशी संपूर्ण तालुक्यात केवळ एकच गाडी रेतीची वाहतूक करत होती का?” असा संतप्त सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. रात्रंदिवस राजरोसपणे सुरू असलेल्या असंख्य अवैध टिप्परकडे डोळेझाक करून केवळ एका दिवसापुरती केलेली ही कारवाई म्हणजे निव्वळ धूळफेक तर नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. सविस्तर वृत्त असे की, नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. याच मोहिमेअंतर्गत दिनांक ०७ ऑगस्ट २०२६ रोजी नरसी ते मुखेड जाणाऱ्या रोडवर एका हायवा टिप्परमधून (क्र. MH-04-JU-0486) अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सदर वाहन अडवले आणि पाहणी केली असता, त्यामध्ये पाच ब्रास रेती आढळून आली. चालकाकडे रेती…

    Read More »
  • क्राईम

    नांदेड भरदिवसा पेट्रोल पंपावर थरार: गँगवारमधून ३२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

    ▫️धनेगाव परिसरात खळबळ; दुचाकीवर पेट्रोल भरण्यासाठी आला असताना अज्ञातांचा हल्ला श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड:- ०८ ऑगस्ट २६  धनेगाव परिसरातील एका पेट्रोल पंपावर भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंदर सिंग बावरी (वय ३२) असे या मृत तरुणाचे नाव असून, ही हत्यागँगवार मधून (टोळीयुद्ध) झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. वर्दळीच्या ठिकाणी आणि भरदिवसा हा थरार घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इंदर सिंग बावरी हा आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी धनेगाव परिसरातील पेट्रोल पंपावर आला होता. तो पंपावर असतानाच अचानक तिथे आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर थेट जीवघेणा हल्ला चढवला. हा हल्ला इतका भयानक होता की, यात गंभीर जखमी झालेल्या इंदर सिंग बावरी याचा जागीच मृत्यू झाला. मृत इंदर सिंग बावरी हा मूळचा कौठा परिसरातील रहिवासी होता. या हत्ये मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या जुन्या वैमनस्यातून आणि गँगवार…

    Read More »
  • सामाजिक

    जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावे यासाठी मुखेड अभिवक्ता संघाचे तहसिलदारांना निवेदन!

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड : ०८ ऑगस्ट २६ जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांसाठी दाखल केलेले अर्ज दीर्घकाळ प्रलंबित राहत असल्याने नागरिकांना मोठ्या…

    Read More »
  • सामाजिक

    लेंडी प्रकल्पग्रस्तांचा शासनाला थेट इशारा: प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास १८ ऑगस्टला घेणार जलसमाधी!

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड :- ०७ ऑगस्ट २६  लेंडी मध्यम प्रकल्पामुळे बाधित झालेल्या हसनाळ आणि परिसरातील नागरिकांनी शासनाच्या उदासीन धोरणाचा तीव्र निषेध करत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. प्रशासनाला शेकडो निवेदने देऊनही पदरी निराशाच पडत असल्याने, मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास येत्या १८ ऑगस्ट २०२६ रोजी थेट धरणात ‘जलसमाधी’ घेण्याचा अल्टिमेटम प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. शासनाने “आधी पुनर्वसन, मग धरण” हे धोरण राबवणे बंधनकारक असतानाही, पुनर्वसन पूर्ण नकरताच धरणात पाणीसाठा (गळभरणी) करण्यास परवानगी कशी दिली? याची स्वतंत्र व निष्पक्ष…

    Read More »
  • राजकीय

    संजय गांधी, श्रावणबाळ व दिव्यांग योजनांचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मंजूर करा! :- मुखेड काँग्रेसची मागणी

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड: ७ ऑगस्ट २६ संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि दिव्यांग योजनांचे प्रलंबित असलेले प्रस्ताव प्रशासनाने तात्काळ मंजूर करून लाभार्थ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी मुखेड तालुका आणि शहरकाँग्रेस कमिटीच्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी आणि मा. तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. सर्वसामान्यांना आणि गरजूंना आर्थिक आधार देणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या योजना आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून या योजनांचे अनेक प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहेत. यामुळे वृद्ध, निराधार आणि दिव्यांग नागरिकांना अनुदाना पासून वंचित राहावे लागत असून, त्यांना नाहक आर्थिक वमानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन प्रलंबित प्रस्तावांची लवकरात लवकर छाननी करावी आणि ते मंजूर करावेत, अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने या निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन देते वेळी प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ. श्रावण रॅपणवाड, काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर, ओबीसी नेते विश्वनाथराव कोलमकर, तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंद्रीकर, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील आरगीळे, ओबीसी काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश निमलवाड, काँग्रेस शहर उपाध्यक्ष बालाजी वाडेकर, युवक काँग्रेस उपाध्यक्ष एम. आर. गोपणर आणि राजुभाऊ बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.…

    Read More »
  • सामाजिक

    हृदयद्रावक! बियाण्यांसाठी ठेवलेले कीटकनाशक ठरले काळ; विषारी प्रभावाने दोन सख्या चिमुकल्या बहिणींचा दुर्दैवी अंत

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क धर्माबाद :- ०६ ऑगस्ट २६  हरभरा बियाण्याला कीड लागू नये म्हणून घरात साठवून ठेवलेल्या कीटकनाशकाच्या विषारी…

    Read More »
  • राजकीय

    जीर्ण अंगणवाड्यांच्या जागी नवीन इमारती मंजूर करा; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची गट विकास अधिकाऱ्यांकडे मागणी

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नायगाव ०६ ऑगस्ट २६ मांजरम येथील सर्व अंगणवाड्यांचे तातडीने सर्वेक्षण करून तेथील जीर्ण झालेल्या इमारतींच्या जागी नवीन इमारती मंजूर कराव्यात, तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य, खेळणी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नायगावचे गट विकास अधिकारी. वानखेडे यांना निवेदन दिले. यासोबतच, तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून थकीत असलेले हप्ते व बिले तात्काळ त्यांच्या खात्यावर अदा करण्यात यावीत, अशीही मागणी पांडुरंग शिंदे यांनी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी वानखेडे यांच्याकडे लावून धरली. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस किरण वाघमारे, व्यंकट अण्णा शिंदे, विश्नभर शिंदे, मधुकर शिंदे, गणेश वाघमारे, रोहिदास नव्हारे आणि काशिनाथ बाळापुरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Read More »
  • राजकीय

    युवा शक्तीच्या जोरावरच ‘रासप’ राज्यात मोठी ताकद बनेल: युवा प्रदेशाध्यक्ष अजित पाटील

    ▫️रासपची युवा संवाद बैठक संपन्न; आगामी निवडणुकांसाठी संघटन मजबुतीचा एकमुखी संकल्प श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड :- ०५ ऑगस्ट २६…

    Read More »
  • राजकीय

    शेतकरी नेते राकेश टिकैत ५ ऑगस्टला नांदेडमध्ये; ‘भारत-अमेरिका व्यापारी करारावर’ करणार मार्गदर्शन

    श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड: ०४ ऑगस्ट २६ संयुक्त किसान मोर्चाचे प्रमुख राष्ट्रीय नेते. राकेश टिकैत हे ५ ऑगस्ट रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून, ते एका विशेष शेतकरी मेळाव्यात भारत–अमेरिका व्यापारी करारा बाबत (ट्रेड डील) मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळावा शहरातील शंकरराव चव्हाण सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. देशभरात सध्या ‘भारत–अमेरिका ट्रेड डील‘बाबत मोठी चर्चा सुरू असून, या कराराचे देशावर आणि विशेषतः शेती क्षेत्रावर काय परिणाम होतील, याविषयी जनजागृती करण्यासाठी राकेश टिकैत हे संपूर्ण देशभरात मोहीम राबवत आहेत. या मोहिमेचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये या विशेष शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११…

    Read More »
  • सामाजिक

    मुखेड ‘महिला बाल कल्याण’ प्रकल्प कार्यालयाचीच दुरवस्था: गळके छत, चिखलाचे साम्राज्य आणिशौचालया अभावी महिलांची कुचंबणा!

    ▫️गळके छत आणि कार्यालयात बादल्या ठेवण्याची वेळ श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड :-३ ऑगस्ट २६ एकीकडे शासन ‘स्वच्छ भारत‘, ‘महिला सन्मान‘ आणि सक्षमीकरणाच्या मोठ्या गप्पा मारते, तर दुसरीकडे महिलांच्या हितासाठीच स्थापन झालेल्या ‘महिला बाल कल्याण विभागा‘च्या मुखेड प्रकल्पकार्यालयात महिला कर्मचाऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. कार्यालयाला गळती लागली आहे, जाण्यासाठी धड रस्ता नाही आणि सर्वात संतापजनक बाब म्हणजे कार्यालयात साधं शौचालय नसल्याने शेकडो अंगणवाडी सेविका आणि महिला कर्मचाऱ्यांना नैसर्गिक विधीसाठी उघड्यावर बसावे लागतआहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचे आणि दुरवस्थेचे विदारक वास्तव छाया चित्रांमधून समोर आले…

    Read More »
Back to top button