क्राईम

मुखेड येथे १८ वर्षीय तरुणाची आत्महत्या; परिसरात हळहळ

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क मुखेड :- २८ नोव्हेंबर २६

मुखेड शहरातील शिवाजीनगर भागात एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने राहत्याघरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोहम संतोष संगनवार (वय १८) असेया तरुणाचे नाव असून, तो बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. या घटनेमुळे शहरात आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शिवाजीनगर भागातील किराणा व्यापारी संतोष संगनवार यांचा धाकटा मुलगा सोहम याने शुक्रवारी (दि. २७ नोव्हेंबर) दुपारी २ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत छताच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी नंतर त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरू केली. डॉ. बालाजी गरुडकर यांनी शवविच्छेदन केले, तर विरभद्र पाटील आणि यादव इबितदार यांनी या प्रकरणाचा पंचनामा केला आहे. सोहमच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसून मुखेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button