महाराष्ट्र
-
अजित पवारांच्या मृत्यूची सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वाखाली चौकशी करा, ममता बॅनर्जी यांची मागणी
नवी दिल्ली:- २९ जानेवारी उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी बारामती या ठिकाणी विमानाचा अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांचं विमान शेतात कोसळलं, त्यानंतर विमानाला आग लागली. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान या विमान अपघाताची सुप्रीम कोर्टाच्या नेतृत्वाखाली चौकशी करावी, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममताबॅनर्जी म्हणाल्या कि इथे कोणीही सुरक्षित नाही. अजित पवार पुन्हा सक्रिय राजकारणात सहभागी होणार होते, हे मी स्वतः पाहिलं होतं. अशा परिस्थितीत हा अपघात कसा झाला?, हा गंभीर प्रश्न असल्याचं ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी होणं अत्यावश्यक असून, सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखी खाली योग्य तपास व्हावी, अशी मागणीही त्यांनीकेली. या अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भावना व्यक्त करत म्हणाले कि आमच्या सहकाऱ्याचा जीव या विमान दुर्घटनेत गेला आहे, पाच ते सहा जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे याविमान अपघाताची चौकशी नक्कीच झाली पाहिजे, कारण यापुढे देखील अशा प्रकारच्या अपघात होताकामा नये यासाठी हे गरजेचं आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने स्पष्ट केलं आहेकी त्यांनी अद्याप कोणालाही समन्स बजावलेले नाहीत. या प्रकरणाचा अधिकृत तपास आताएअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडे (एएआयबी) सोपवण्यात आला असून, पुढील सर्वचौकशी आणि निर्णय एएआयबी घेणार आहे. विमान लँडिंगला अवघे काही मिनिट शिल्लक असताना हा अपघात झाल्यामुळं या अपघाताविषयी एकसंभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, वरिष्ठ पत्रकार सुहेल सेठ यांनी एक खळबजनक दावा करणारी पोस्ट एक्सवर केली आहे. त्यांनी या अपघाता बाबत विमान कंपनी व्हीएसआरकडे बोट दाखवलं आहे. सुहेल सेठ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,…
Read More » -
माझ्या हत्येचा कट होता; पण ही शेवटाची सुरुवात’, शाईफेकीनंतर प्रवीण गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया
सोलापूर : १३ जुलै २५ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर आज शाई फेकीची घटना घडली. या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सरकावर आरोप केले. आपल्या वरील हल्ल्याच्या घटनेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे, असं प्रवीण गायकवाड म्हणाले. तसेच आपल्या हत्येचा कट होता आणि ही शेवटाची सुरुवात आहे, असंदेखील प्रवीण गायकवाड म्हणाले आहेत. “मीअक्कलकोटला गेलो होतो. अचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळंवंगन तेल टाकलं. त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट खरी आहे. पण ही विचारधारा जी आहे, तुम्हाला आठवत असेल, डॉ. पानसरे यांचा खून झाला. डॉ. कलबुर्गी, डॉ. नरेंद्रदाभोळकर यांचा खून झाला. डॉ. गौरी लंकेशचा खून झाला. या सत्ताकाळात पुरोगामी विचारांचे कार्यकर्तेहे असुरक्षित आहेत“, असं प्रवीण गायकवाड म्हणाले. “माझ्या हत्येचा कट होता. माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झाला आहे. माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्तेसंभाजी भोसले असतील, त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी जिवंत आहे. अन्यथा माझ्यावर हल्लाझाला होता. याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे“, असं प्रवीण गायकवाड स्पष्ट म्हणाले.
Read More » -
आज केज येथे शेतकरी कामगार पक्षाचा विभागीय मेळावा
केज प्रतिनिधी :- ०८ जून २५ शेतकरी कामगार पक्षाचा विभागीय मेळावा ८ जुन रोजी सकाळी ११ वाजता येथे जे. के. फंक्शन हॉल(मंगल कार्यालय) फुलेनगर केज येथे होणार आहे. या मेळाव्याला शेकापचे सरचिटणीस माजी आमदार भाई जयंत पाटील, माजी आमदार भाई बाळारामपाटील. आमदार डॉ बाबासाहेब देशमुख, पक्षाचे शेतकरी सभा प्रदेशाध्यक्ष भाई एस. व्ही. जाधव सर, पक्षाचे खजिनदार भाई अतुल म्हत्रे, कार्यालयीन चिटणीस ड. राजेंद्र कोरडे, सहचिटणीस भाई बाबासाहेब देवकर, कार्यालयण सहचिटणीस भाई प्रा. उमाकांत राठोड, महिलांच्या प्रदेश चिटणीस मानशी म्हात्रे. जेष्ठ नेते भाई बाबुराव लगारे, बाधित शेतकरी महामार्ग आघाडीचे भाई दिगंबर कांबळे, शिक्षक आघाडीचेप्रा. चंद्रकांत चव्हाण, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई युनुस पाठाण, राज्य चिटणीस मंडळसदस्य डॉ. अनिकेत देशमुख, चिटणीस मंडळ सदस्य ड. उदय गवारे, चिटणीस मंडळ सदस्य भाई विकासशिंदे, चिटणीस मंडळ सदस्य चित्रलेखा गोळेगावकर, विद्यार्थी आघाडी साम्या कोरडे यांच्यासहमराठवाड्यातील सर्व मध्यवर्ती समितीचे सदस्य जिल्हाप्रमुख तालुका प्रमुख मान्यवर उपस्थित रहाणारअसल्याची माहिती भाई मोहन गुंड यांनी दिली आहे. या मेळाव्यात शेतकरी कामगारांच्या प्रश्नावर चळवळ उभी करण्यासाठी विविध ठराव घेण्यात येणारआहेत. तसेच, मराठवाडा विभागातील प्रमुख पदाधिकाऱ्याच्या निवडी देखील या मेळाव्यामध्ये करण्यातयेणार आहेत. मराठवाडा विभागातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे. असे, आवाहन भारतीयशेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.
Read More » -
मुखेडात भारतीय लष्कराचे काँग्रेस कडून अतिशबाजी व घोषणानी अभिनंदन
मुखेड -(ता. प्रतिनिधी) भारतीय लष्कराने पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचे अड्डे उध्वस्त करणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर‘ चे मुखेड काँग्रेसकडून शहरातील चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून लष्कराचे अभिनंदन करण्यात आले. भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर‘ कारवाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश सचिव श्रावण रॅपनवाड आणि काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंदरीकर यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुखेड शहरातील चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून भारतीय लष्कर जिंदाबाद भारतीय लष्कराचा विजय असो पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. शहरातील पटेल चौक बसस्थानक चौक बाबा आंबेडकर पुतळा चौक आणि हुतात्मा चौकासह अनेक चौकात फटाक्यांची आतषबाजी करून भारतीय लष्कराची कारवाई जनतेस सांगितले. अचानक झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीने शहरात वेगळेच वातावरण निर्माण झाले. विविध शहरातील मुखेड मध्ये सुरू झाली काय अशी चर्चा नागरिकात चालू होती. यावेळी काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.श्रावण रॅपनवाड, तालुका कार्याध्यक्ष संभाजी पाटील उंदरीकर यांच्यासह युवक काँग्रेस शहराध्यक्ष जयप्रकाश कानगुले, ओबीसी शहराध्यक्ष बालाजी वाडेकर,युवा नेता सदाशिव चव्हाण, विलास पाटील इमडे, बालाजी इंगोले, कपिल काठेवाड, ओंकार जाधव, उत्तम कासले, पप्पू कासले, संतोष पवार, महेश धोत्रे, शिवाजी जांभळीकर आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More » -
महाराष्ट्राचे शूर : पुत्र देगलूर तालुक्यातील सचिन वनंजे काश्मीर मध्ये शहीद
अत्यविधी दि ९ मे रोजी सकाळी १० वाजता देगलूर येथे होणार देगलूर प्रतिनिधी:- काश्मीरच्या तुफानी थंडीमध्ये देशसेवेचे व्रत जोपासणारे तमलूर (ता. देगलूर) गावचे सुपुत्र जवान सचिन यादव वनंजे (वय ३०) यांनी दि ७ मे २५ रोजी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. दुपारी १२ ते १ च्यासुमारास ड्युटीवर असताना त्यांचे वीरमरण झाले. या दुःखद घटनेने संपूर्ण देगलूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. शहीद सचिन वनंजे हे लहानपणा पासूनच राष्ट्र…
Read More » -
परभणी दगडफेक प्रकरणातील तरुणाच्या मृत्यूनंतर उद्या महाराष्ट्र बंदची हाक
आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकरांनी केली मोठी मागणी! परभणी : जिल्ह्यातील दगडफेक प्रखरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू…
Read More » -
पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
अहिल्यानगरमध्ये 23 कोटींचे दागिने जप्त ठाणे:- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यंत्रणे सोबतच पोलिसांच्या संयुक्त गस्त पथकाच्या माध्यमातून वाहनांची तपासणी केली जात…
Read More » -
अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख
सकाळी 9.30 वाजेपासून कार्यालय सुरू असतील नांदेड प्रतिनिधी :- नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर…
Read More » -
शेतीसाठी विहीर खोदताय, मग असं मिळवा 4 लाख रुपये अनुदान
पुणे:- अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीमधील लाभार्थ्यांना विहीर खोदाईसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात दीड लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे…
Read More »