आर्थिक

  • मुक्रमाबादमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई 9 किलो 850 ग्रॅम गांजा जप्त, दोघांना अटक

    मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २३ जून २६  अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, नांदेड पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत मुक्रमाबाद परिसरातून दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ९ किलो ८५० ग्रॅम गांजा व एक मोटारसायकल असा एकूण ६ लाख ५२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्रमाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. या कारवाईत रामकिशन मुलगीर नटवे(रा. जळकोट, जि. लातूर) व शंकर सदानंद धोते (रा. लते गल्ली, जि. लातूर) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून गांजा व मोटारसायकल जप्त करण्यात आली असून मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे अधिकारी करीत आहेत.

    Read More »
  • नांदेडमध्ये १५,५६९ बनावट जन्म प्रमाणपत्रांचा घोटाळा

    ▫️झारखंडमधून पाच जण अटकेत, मास्टरमाइंड बिहारचा नांदेड प्रतिनिधी:- २२ फेब्रुवारी २६ नांदेड : डिजिटल व्यवस्थेचा गैरवापर करत नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावळेश्वर(लोकसंख्या सुमारे १५००) या गावातून तब्बल १५ हजार ५६९ बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्रेकाढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नांदेड पोलिसांनी झारखंडमधून पाचजणांना अटक केली असून मुख्य सूत्रधार बिहारमधील असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यासाठी पोलिसांचे पथक बिहारला रवाना झाले आहे. १५ दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नांदेड दौऱ्यात हा प्रकार उजेडात आणला होता. झारखंडमधील एका व्यक्तीने सावळेश्वर येथून काढलेले जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आल्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली. सुरुवातीला उस्माननगर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची सूत्रे लोहा येथील पोलिस निरीक्षक नवनाथ आयलाने यांच्याकडे देण्यात आली. सायबरपथकाच्या मदतीने झारखंडमधील गढवा येथून जितेंद्र कुमार सिंह, महेंद्र प्रताप सिंह, ओमप्रकाश मिश्रा, लक्ष्मी पंडित, सुमित कुमार सिंह व सतीश कुमार साहू यांना अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी सध्यापोलिस कोठडीत आहेत. सीआरएस (Civil Registration System) पोर्टलवरील सावळेश्वर ग्रामपंचायतीचा यूजर आयडी वपासवर्ड झारखंडमधील आयपी अॅड्रेसवरून हॅक करण्यात आला होता. मे ते नोव्हेंबर २०२५ याकालावधीत १५ हजारांहून अधिक बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आली. या रॅकेटमध्ये व्हॉट्सअॅपग्रुप, दलाल व सायबर कॅफे चालकांचा सहभाग असल्याचेही तपासात उघड झाले आहे. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, झारखंड, तेलंगणा, बिहार व पश्चिम बंगाल या राज्यांपर्यंत या रॅकेटची व्याप्ती असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस तपास सुरू आहे.

    Read More »
  • विद्युत शॉक लागून बैलाचा मृत्यू; कोळपणी करताना विद्युत पोलचा घात

    ▫️किनवट तालुक्यातील कोसमेट गाव येथील घटना  ▫️शेतकऱ्याचा बैल मरण पावल्याने शेतकरी  आर्थिक अडचणीत किनवट/कोसमेट १७ जुलै २५ शेतात कोळपणी करताना लोखंडी विद्युत पोलमध्ये उतरलेल्या विजेमुळे बैलाला शॉक लागून जागीचमृत्यू झाल्याची घटना दि १६ जुलै रोजी अंदाजे ११.३० च्या…

    Read More »
  • मुखेड शहरातील घटना दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्याने पळविली ७ लाख ७० हजारांची रक्कम

    मुखेड प्रतिनिधी:- १९ जून २५ मुखेड शहरातील नांदेड मर्चेंट बँकेच्या बाहेर चोरट्याने भरदिवसा दुचाकीची डिक्की काढूनत्यातील ७ लाख ७० हजार रुपयांची रक्कम पळविली घटना दि. १८ जून रोजी सकाळी ११: ३० वाजताघडली. फिर्यादी देवीप्रसाद संभाजी वडजे वय २९ वर्ष रा. अशोक नगर व्यवसाय गोविंद स्टोन क्रेशर वर्ताळा तांडा. ता. मुखेड येथील व्यवस्थापक यांनी सकाळी ११ वाजता मुखेड शहरातील एसबीआय बँकेत जाऊन ७लाख ७० हजार रुपये उचलले. त्यात १०० व २०० च्या नोटा असल्याने बदलून घेण्यासाठी दुचाकी वाहनक्रमांक एमएच २६ ए एक्स ६७९६ या गाडीवर शहरातील असलेल्या नांदेड मर्चेंट बँकेसमोर गाडी लावून५०० रुपयांच्या नोटा बदलून मिळेल का ? म्हणून विचारण्यासाठी बँकेत गेले होते. बँकेतुन परतआल्यावर डिक्कीतील रक्कम नसल्याचे समजले. यावेळी आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता ७ लाख ७० हजार रुपयांची पिशवीदोन युवक मोटार सायकलवर येऊन डिक्कीतून पिशवी काढून पळ काढताना दिसत आहेत. या प्रकरणीफिर्यादी देवीप्रसाद वडजे यांच्या फिर्यादीवरून मुखेड पोलिसांत भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२), ३(५) अन्वये दोन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीसउपनिरीक्षक मंचक फड हे करीत आहेत. घटनेचे गांभीर्य पाहता देगलूरचे पोलीस उपविभागीय अधिकारीसंकेत गोसावी यांनी घटनास्थळी भेट दिली व नांदेड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे टीम यांनी सुद्धाघटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे

    Read More »
Back to top button