अवैध गौण खनिज उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा : महसूल मंत्री बावनकुळे

महसूल मंत्री यांच्या आदेशानुसार मुखेडचे तहसीलदार अवैध गौण खनिजावर कार्यवाही करतील काय?
मुखेड प्रतिनिधी-
अवैध गौण खनिज उपसा आणि वाहतूक करणाऱ्या गौण खनिजांच्या अवैध उपसा आणि वाहतुकीवर आता कठोर कारवाई होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयातील दालनात बैठकी राज्यातील अवैध गौण खनिज उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश बैठकीत दिले.
परंतु मुखेड शहरातून गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शासनाचे ठेके बंद असताना काळी रेती व लाल रेती हायवा टिप्पर मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात भरून वाहतूक होत असतानाच्या प्रशासनाकडे वारंवार सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांच्याकडून तक्रारी करण्यात येत होत्या तरी देखील प्रशासनाने कारवाई करत नसल्याने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे मनोबल उंचावले त्याचबरोबर शहराच्या चारीबाजूला मुखेड ते कौठा रोडवर व मुखेड ते शिरूर ताजबंद रोडवर तसेच मुखेड ते हिप्पट रोडवर त्याच बरोबर मुखेड ते नरसी रोडवर खरब खंडगाव येथे अवैधरित्या दगड कटिंगच्या आरामशीन निर्माण झाल्या असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गौण खनिज साठवण केल्याचे दिसून येते याबाबत तहसील कार्यालय मुखेडयांच्याकडे वारंवार लेखी तक्रारी करून देखील मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी कसल्याच प्रकारची कारवाई करीत नसल्याने शहरातील अवैधरित्या गौणखणीजचा व्यवसाय करणारे व्यवसाय हे प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवीत आहेत या सर्व प्रकरणाला जबाबदार महसूल प्रशासन आहे नुकतीच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः अवैध वाहतूक यावर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहे बावनकुळेयांनी आदेशित केल्याप्रमाणे मुखेडचे तहसीलदार हे अवैध गौन खनिज वाहतुकीवर कार्यवाही करणार का? व मुखेडच्या चारी बाजूला अवैधरित्या गौणखणीजचा व्यवसाय करणाऱ्या आरामशीन वर कारवाई करतीलकाय याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे



