आरोग्य

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एका बांधकाम कामगाराचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

मुखेड | प्रतिनिधी २ जानेवारी

मुखेड शहरालगत असलेल्या उमरदरी रोडवर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघातझालाया अपघातात एका युवक बांधकाम कामगाराचा   जागीच मृत्यू झाला असूनदुसरा युवक गंभीर जखमी झाला आहेही दुर्दैवी घटना दिनांक  फेब्रुवारी २०२६ रोजी घडली.

या अपघातात अरमान युसुफ पठाण (वय १५राफुले नगरमुखेडहा युवक गंभीर जखमी झाला आहेत्याच्यावर प्रथमोपचार मुखेड उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आलेप्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नांदेड येथील मुख्य जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

अयान साजीद शेख (वय १८रावाल्मीक नगरमुखेडया युवकाचा मात्र अपघात स्थळीच मृत्यू झाला.

अपघाता नंतर मुखेड उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉसतीश रायकोडे  आधी परिचारिका पूजा वाघमारे यांनी जखमी युवकावर तात्काळ उपचार केलेतसेच जखमीला नांदेड येथे हलवण्यासाठी लखन पवारकक्षसेवक माऊली धनगेअमर सूर्यवंशीऋषिकेश गुट्टे  हनुमंत नागरगोजे यांनी मोलाची मदत केली.

या घटनेमुळे मुखेड शहरात हळहळ व्यक्त होत असूनअज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडूनपुढील तपास सुरू आहे.

मुखेड पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास  सहाय्यकपोलीस उपनिरीक्षक जावेद शेख हे  करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button