शहर

हलाखीवर मात, जिद्दीने मारली बाजी! मुखेडच्या सरफराजला एकाच वेळी दोन सरकारी नोकऱ्यांचे कॉल

मुखेड प्रतिनिधी :- श्रमिक एकता न्यूज़ ०७ जून २६ 

नशिबाचे फेरे कितीही कठीण असले तरीजर सोबतीला जिद्द आणि अपार मेहनत असेल तर यशाचे शिखर गाठता येतेहे मुखेडच्या सरफराज मुजीब शेख याने सिद्ध करून दाखवले आहे

सरफराजची पुणे SRPF गट क्र. २ मध्ये निवड झाली असूनत्याच्या या यशाने संपूर्ण शहरात कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सरफराजची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहेत्याचे वडील एका हॉटेलमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतातमुलाने शिकावे आणि मोठे व्हावेया स्वप्नासाठी त्यांनी दिवसरात्र कष्ट उपसलेसरफराजला देशसेवेचा वारसा त्याच्या घरातूनच मिळाला आहेत्याचे आजोबा मैनोद्दीन हैदर शेख यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावून देशाचे रक्षण केले होतेआजोबांचा तोच वारसा आता नातू पुढे चालवणार आहे.

एकाच वेळी दोन मोठ्या संधी सरफराजच्या मेहनतीला असे फळ मिळाले कीत्याला एकाच वेळी दोन विभागांतून नियुक्तीचे आदेश आलेपुणे SRPF गट क्र. २ आणि नागपूर कारागृह पोलीस या दोन्ही ठिकाणी त्याची निवड झालीमात्रसरफराजने पुणे SRPF मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलीस निरीक्षक होण्याचे स्वप्न निवडीनंतर आपली भावना व्यक्त करताना सरफराज म्हणाला की,”हे यश केवळ माझे नसून माझ्या वडिलांच्या कष्टाचे फळ आहेआज पोलीस दलात शिपाई म्हणून प्रवेश करत असलोतरी माझे स्वप्न येथेच थांबणार नाहीभविष्यात स्पर्ध परीक्षांच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक होऊन समाजाची सेवा करायची आहे.

मुखेडच्या या सामान्य घरातील तरुणाने दाखवलेल्या असामान्य कर्तृत्वामुळे तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहेसर्व स्तरांतून सरफराजवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button