राजकीय

नांदेड विधान परिषद निवडणूक: ८ उमेदवारांचे १७ नामांकन अर्ज दाखल!

नांदेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २ जून २६

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. २७ मे ते १ जून दरम्यान एकूण ८ उमेदवारांनी १७ नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.

दाखल झालेल्या अर्जामध्ये कृष्णा नागेश पाटील (अपक्ष) – ४ अर्ज प्रविण प्रतापराव चिखलीकर(नॅशनॅलीस्ट काँग्रेस पार्टी/अपक्ष) – २ अर्ज अमरनाथ अनंतराव राजूरकर (भाजप) – ४ अर्ज ज्योतिबा जयरामजी खराटे (अपक्ष) – ३ अर्ज पवार माधवराव निवृत्तीराव (अपक्ष) – १ अर्ज रामदास शिवराज पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – १ अर्ज पंकज माणिकराव गायकवाड (अपक्ष) – १ अर्ज प्रशांत विराजइंगोले (अपक्ष) – १ अर्ज भाजपचे अमरनाथ राजूरकर आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रामदास पाटीलयांनी पक्षाचा अधिकृत AA-BB फॉर्म सादर केला आहेनामनिर्देशन अर्जाची छाननी २ जून रोजी होणारअसूनअर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून २०२६ आहेमतदान १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ तेदुपारी ४ वाजेपर्यंत होईलतर मतमोजणी २२ जून २०२६ रोजी करण्यात येणार आहेया निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील ४५२ पात्र मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button