Uncategorized

विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत जि.प. मुलींचे हायस्कूल जिल्ह्यात प्रथम.

मुखेड / प्रतिनिधी.

  राष्ट्रीय संग्रहालय परिषद भारत सरकार, नेहरू विज्ञान केंद्र वरळी मुंबई आणी शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४-२५ मध्ये राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा विविध स्तरावर आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार नांदेड येथील किडस किंगडम पब्लिक स्कूल मालेगाव रोड खुरगाव येथे दि.२२ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरिय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मुखेड येथे गटसाधन केंद्राच्या वतीने तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव व बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील १० शाळांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये पिएमश्री आदर्श शाळा जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड प्रशालेने विज्ञान नाटीकेचे उत्कृष्ट सादरीकरण करीत जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.या यशाबद्दल स्पर्धेतील सहभागी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
 नांदेड येथे आयोजीत जिल्हास्तरिय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेचा मुख्य विषय मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा होता त्यातील ए.आय. आणि समाज या विषयावर नाटीकेचे सादरीकरण करण्यात आले.यासाठी नाट्यलेखक, दिग्दर्शक विश्वाभंर जाधव, मार्गदर्शक सहशिक्षिका सहशिक्षिका सौ.अश्विनी कुलकर्णी,सौ.सविता उमाटे, श्रीमती आशालता स्वामी,  सहशिक्षक नवनाथ खांडेकर, चंद्रकांत डावकरे यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नांदेड येथे विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेचे आयोजन श्री.फराले व सहका-यांनी केले होते.परिक्षक म्हणून श्रिमती क्षमा करजगावकर,प्रा.राजेश्वरराव रायनी,डाॅ.एम.एम.देशमुख यांनी काम पाहीले.सदर नाट्योत्सव स्पर्धेत रुद्रानी संदीप गरुडकर, प्रेरणा चंद्रकांत सोनकांबळे,स्नेहा बालाजी डोंणगाये,श्रद्धा सदाशिव जाधव,सोनल अंगद होनवडजकर,सानवी संदीप जाधव,ऋतुजा नरसीग शिंगाडे, चिन्मयी जगदीश खेडकर यांनी विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत  सहभाग घेवुन नेत्रदीपक यश संपादन करत जिल्ह्यामध्ये प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.जिल्हास्तरिय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवून विभागस्तरीय स्पर्धेसाठी जि.प.मुलींच्या हायस्कूलची निवड झाल्याबद्दल तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे,शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब कदम, केंद्रप्रमुख यु.पी.चव्हाण, मुख्याध्यापक डी.जे.कांबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेताब शेख, उपाध्यक्षा उर्मिला गिते सह शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,प्रशालेचे शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करुन विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button