मुखेड रजिस्ट्री कार्यालयात आर्थिक पिळवणूक प्रकरण दोषीवर कार्यवाही करा अन्यथा अमरण उपोषण – अरण्ये

कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे तहसिलदार यांचे सह जिल्हा निबंधक यांना पत्र
मुखेड प्रतिनिधी
मुखेड दुय्यम निबंध कार्यालयात रजिस्ट्री करीत असताना सर्व सामान्य नागरीकांची मोठी लुट होत असुन रजिस्ट्रीला ज्यादा रक्कम घेण्यात आली असुन ती वापस करण्यासाठी विश्वनाथ अरण्ये यांनी दि. 26 डिसेंबर 2024 रोजी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली होती. या पत्राच्या अनुषंगानने तहसिलदार राजेश जाधव यांनी सह जिल्हा निबंधक यांना पत्र काढून कार्यवाही करुन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
मुखेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात मोठया प्रमाणात सर्व सामान्यांची आर्थिक पिळवणूक होत असते पण याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने अधिकायांचे चांगभले होत आहे. वि·ानाथ अरण्ये यांनी पत्र देऊन ही 15 दिवस होऊनही अद्याप ठोस कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही.
स्टॅम्प डयुटीच्या नावाखाली हजारो रुपये रजिस्ट्री करणाया नागरीेकांडून वसुल केले जात असले तरी प्रशासन मात्र झोपेपे सोंग घेत असल्याचे दिसून येते. सर्व सामान्य नागरीकांनी तक्रार करुनही न्याय मिळत नसल्याने प्रशासनावरुन जनतेचा भरोसा धुसर होत चालल्याचे दिसून येत आहे. तक्रारदारास अद्याप रक्कम मिळालेली नाही व घेणायावर सुध्दा कार्यवाही झालेली नाही. दोषींवर कठोर कार्यवाही करून न्याय द्यावा अन्यथा तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याची माहिती अर्जदार विश्वनाथ अरण्ये याने सांगितले आहे.
सर्व सामान्य नागरीकांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी जनतेतून समोर येत आहे.



