आज दहावी परीक्षेचा निकाल

दुपारी १ वाजता अधिकृत संकेत स्थळावर पाहता येणार निकाल
मुखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज १३ जाहीरहोणार आहे. दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल. राज्यमाध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकालजाहीर झाला होता. तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकतालागली होती.
अखेर ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिकशिक्षण मंडळाकडून आज १३ मे रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला जाईल असे जाहीर
करण्यात आले आहे. दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज अधिकृत संकेत स्थळावर दुपारी १वाजता पाहता येणार आहे. त्यानंतर शिक्षण मंडळाकडून नियोजन केलेल्या कालावधीत आपापल्याशाळांमध्ये विद्यार्थ्यांना मुळेगुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. फेब्रुवारी–मार्च २०२५ महिन्यातदहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. शिक्षण मंडळाकडून उद्या दहावीचा निकाल जाहीर केलाजाणार असल्याने विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे.
येथे पाहा निकाल ?
https:// results.digilocker.gov. in, https://sscresult. mahahsscboard.in, http:// sscresult.mkcl.org, https:// results.targetpublications.



