मुखेड मधील दोन विविधघटनेत वीज पडून १ म्हैस व ५ शेळ्यांचा मृत्यू

तालुक्यातील दोन विविधघटनेत गावांमध्ये वीज पडून जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये एक म्हैस व पाच शेळ्यांचा मृत्यू झाला.
मंगळवारी जांब (खु.) येथील शेतकरी गणेश शंकरराव गोंड यांच्या मालकीची म्हैस वीज पडून जागीच मरण पावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या घटनेत तग्याळ येथील शेतकरी मनोहर शंकर गोपनर यांच्या ५ शेळ्यांवर वीज पडल्याने मृत्यू झाला.

मंगळवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन तालुक्यात विजांच्या कडकडाटासह वादळ वारेवाहून पावसास सुरूवात झाली. वादळी वाऱ्याने ग्रामीण भागातील काही ठिकाणच्या झाडांचे तर काही घरांवरील टिनपत्रे उडाली.
तहसीलदार राजेश जाधव यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही घटनांचा पंचनामा करून अहवाल वरीष्ठ कार्यालयात सादर करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.




