नांदेड स्थानिक प्राधिकारी निवडणूक: ५ उमेदवारांची माघार; आता अमरनाथ राजूरकरांसह ३ उमेदवार निवडणूक रिंगणात!

▫️भाजपकडून अमरनाथ राजूरकर तर दोन अपक्ष उमेदवारांमध्ये लढत
▫️अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट; राजकीय घडामोडींना वेग
नांदेड प्रतिनिधी श्रमिक एकता न्यूज़ ०४ जून २६
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ चे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात केवळ ३ उमेदवार उरले आहेत. यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.
नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी राजकीय पक्षांच्या व्यूह रचनेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, छाननी आणि अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर आतारिंगणात राहिलेल्या उमेदवारांची नावे आणि पक्ष खालीलप्रमाणे आहेत:
१) अमरनाथ राजूरकर (भारतीय जनता पार्टी) २) कृष्णा नागेश पाटील (अपक्ष) ३) प्रशांत विराज इंगोले (अपक्ष)
अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत ५ जणांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे: १)पवार माधवराव निवृत्तीराव (मु.पो. जवळगाव, ता. हिमायतनगर)
२) चिखलीकर प्रवीण प्रतापराव (मु.पो. चिखली, ता. कंधार),३) ज्योतिबा जयरामजी खराटे (माहूर) ४) पंकज माणिकराव गायकवाड (मुखेड) ५) रामदास शिवराज पाटील (नांदेड) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्याने आता प्रत्यक्ष लढतीचे चित्र समोर आले असून, भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकर यांच्याविरुद्ध दोन अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या तारखेनुसार आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींची (मतदारांची) जुळवा जुळव करण्यासाठी सर्वच छावण्यांमध्ये हालचालींना वेग आला आहे.



