सामाजिक

मुखेड तालुक्यातील पिंपळकुंठा–बिल्लाळी पाटी रस्त्याची दयनीय अवस्था!

मुखेड प्रतिनिधी:-

मुखेड तालुक्यातील पिंपळकुठा ते बिल्लाळी पाटीदरम्यानचा रस्ता सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे नष्ट झाले असून, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

रस्त्यावर केवळ खड्डेच नव्हे, तर गिट्टी आणि मोठमोठे दगड यामुळे वाहन चालवणे दुरापास्त झाले आहे. परिणामी, अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, वृद्ध नागरिक, आणि रुग्ण यांना या मार्गावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

या रस्त्याचा वापर पिंपळकुठा परिसरातील नागरिक दररोज बाजारहाट, वैद्यकीय गरजा आणि शेतीसाठी बाराळी, देगलूर या ठिकाणी जाताना करतात. त्यामुळे या रस्त्याचे स्थानिक पातळीवर विशेष महत्त्व असून, त्याची दुरवस्था ही प्रशासनाच्या दुर्लक्षाचे परिणाम असल्याचे नागरिकांचे मत आहे.

“दिवसेंदिवस वाढणारे अपघात आणि हालअपेष्टा यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी या रस्त्याची तात्काळ डागडुजी किंवा नव्याने डांबरीकरण होणे अत्यावश्यक आहे,” अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

तसेच लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी समस्त पिंपळकुंठा गावतील नागरिकांची मागणी आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button