ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोनापुरे यांना शेळी, मेंढी विकास महामंडळावर घेण्याची मागणी

मुखेड/प्रतिनिधी:-
भटक्या व विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पु. अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी मुखेड येथील ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोनापूरे यांची नियुक्ती करावी अशी मागणी माजी जि.प. सदस्य सुर्याजी पाटील चाडकर, पं. स. सदस्य शकरराव काळे, अॅड. मुरलीधरराव डाके, गंगाधर पाटील नारे, दिगांबर पिंपळे, माधवराव श्रीरामे आदी धनगर समाजाच्या नेत्यांनी माजी खा.डॉ. विकास महात्मे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
धनगर व भटक्या प्रवर्गातील समाजबांधवांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी शासनाने पुणे येथे पु. अहिल्यादेवीहोळकर शेळी व मेढी विकास महामंडळाची स्थापना केली आहे. महामंडळाचा सर्वसामान्यांना लाभ मिळवूनदेण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघ संस्कारात वाढलेले, परिवारातील अनेक जबाबदाऱ्या निभावलेलेनिष्ठावंत कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोनापूरे यांची नियुक्ती करुन सामान्य कार्यकर्त्याला न्यायद्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्याजी पाटील चाडकर सरपंच चारवाडी,गंगाधर पाटील नारेडोंगरगांव, माजी पं. स. सदस्य शंकरराव काळे बिलोली, एडवोकेट मुरलीधरराव डाके हादगाव, एड.प्रशांतकोकणे, शिवाजी पाटील हंगरगेकर, शेळगावचे सरपंच संजय पाटील चोंडे, हाणमंतराव मावले उपसरपंचचारवाडी, माधवराव श्रीरामे,माधव पाटील घोणसे, नारनाळीचे सरपंच भुजंगराव देव्हारे, युवा उद्योजक गणेशबिरु, विलास गावंडे माहूर, दिगांबर पिंपळे मरवाळीकर, चिवळीचे सरपंच संदिप पाटील जायनूरे, दिगांबरमाने सर, गोपाळराव म्हेत्रे सर, साहेबराव पाटील नारे, शिवशंकर पाटील देवकत्ते, बालाजी पाटील नारे सर, माजी सरपंच हणमंतराव वनाळे पाटील, प्रदेशाध्यक्ष आनंद बनसोडे परभणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



