क्राईम

हिमायतनगर हादरलं! राजकीय वैमनस्यातून दोन गट भिडले; उमर चौकात ‘रक्तरंजित राडा’

हिमायतनगर प्रतिनिधी:- अजीम हिंदुस्तानी 

श्रमिक एकता न्यूज़ ०८ एप्रिल २६

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले गुन्हेगारीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीयेगेल्या शुक्रवारी झालेल्या गँगवॉरच्या जखमा ताज्या असतानाचआता हिमायतनगर शहरात भरदिवसा दोन गटात तुफान हाणामारी झाली आहेराजकीय वैमनस्य आणि पैशांच्या वादातून झालेल्या या राड्यातचक्क तलवारींचा वापर करण्यात आला असूनयामध्ये  जण रक्ताच्या थारोळ्यात पडले आहेत.

हिमायतनगरमधील गजबजलेल्या उमर चौकात बुधवारी दुपारी  च्या सुमारास ही घटना घडलीगेल्याकाही दिवसांपासून दोन गटांमध्ये राजकीय कारणावरून धुसफूस सुरू होतीबुधवारी या वादाचा स्फोट झालादोन्ही गट समोरासमोर आले आणि बघता बघता लाठ्याकाठ्यांसह धारदार तलवारी उपसल्या गेल्याभरबाजारात सुरू असलेल्या या थरारामुळे व्यापाऱ्यांची आणि नागरिकांची मोठी पळापळ झाली.

विष्णूपुरीत उपचार सुरू या जीवघेण्या हल्ल्यात खालील व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत

शेख शाकीर,शेख रईस (प्रकृती चिंताजनक),शेख कलीम (प्रकृती चिंताजनक आणखी एक अनोळखी तरुण.जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलेमात्र रईस आणि कलीम यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना नांदेडच्या विष्णूपुरी शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात हलवण्यात आलेआहे.

या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहेया राड्यात केवळ गुंड प्रवृत्तीचे लोक नसून एका विद्यमान नगरसेवकाचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप दुसऱ्या गटाने केला आहेराजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

घटनेची माहिती मिळताच हिमायतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणलीशहरात पुन्हा हिंसाचार होऊ नये म्हणून उमर चौक आणि बाजारपेठ भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात एका आठवड्यात  हत्येच्या घटना आणि आता हा ‘तलवारबाजीचा प्रकार यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button