मांजरा नदीपात्रातुन दिवस रात्र अवैध रेती उत्खनन; महसूल अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

बिलोली,देगलूर,मुखेड महामार्गवरून होते क्षमते पेक्षा जास्त अवैध रेतीची वाहातुक
मुखेड प्रतिनिधी:-
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मांजरा नदी पात्रात गेल्या काही महिन्यांपासून अवैध रेतीउत्खनन आणि वाहतुकीचा धंदा खुलेआम सुरू आहे. जेसीबी मशिन्सच्या सहाय्याने रेतीचे अवैध उत्खननआणि क्षमते पेक्षा जास्त रेती वाहतूक सर्रास सुरू आहे बिलोली,देगलूर,मुखेड महामार्ग वरून रात्रीच्याअंधारात व सकाळी पहाटे रेती वाहतूक बिनधास्तपणे केली जात आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराकडे स्थानिक उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून होत असून या प्रकारामुळे शासनाला रॉयल्टी मिळत नसल्याने महसूल विभागाला करोडो रुपयांचा आर्थिक नुकसान होत आहे.
तालुक्यातील येसगी येथील मांजरा नदी पाञातुन गट क्र. २५९ या खाजगी गटातुन शासनाच्या विविधनियम व अटीच्या अधिन राहुन फक्त २७०० ब्रास रेती दि. ०९ मे. ते ०९ जुन पर्यत उपसा व वाहातुकीस शासनाने परवागी दिलेली असताना शासन नियमाचे उल्लंघन करीत खाजगी परवानगीच्या नावाखाली संबधीत परवाना धारकास व महसुल विभागातील अधिकारी आणी मंडळ अधिकारी तलाठी यांनाहाताशी धरुन सिमावर्ती तेलंगना ,कर्नाटक व महाराष्ट्रातील लातुर जिल्ह्यातील रेती तस्कर संबंधीता सोबत अर्थिक तडजोड करुन सर्व शासकिय नियम अटी बाजुला ठेऊन गुंड प्रवृतीचा अवलंब करत बेकायदेशीर पणे सदरील मांजरा नदी घाटातुन दररोज दिवसराञ असंख्य जेशिबी मशिनच्या सहायाने शासकिय सर्वे नंबर आसलेल्या गटातुन मोठ्या प्रमाणात राञंन दिवस लाखो ब्रास रेती उपसा करुन शेकडो हायवाच्या सहाय्याने क्षमते पेक्षा जास्त अवैध रेतीची वाहातुक होत असल्याचे दिसून येते
हा सर्व प्रकार बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी कधी पुढाकार घेणार ? असे मत जनतेतून व्यक्त होत आहे .



