सामाजिक

मुखेडचे माजी नगराध्यक्ष द्वारकादास जाजू यांचे निधन

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ दि १२ मार्च २६

मुखेड येथील नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष द्वारकादास जाजू यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मुखेड शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे. सामाजिक, राजकीय तसेच व्यापारी क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

द्वारकादास जाजू यांनी नगराध्यक्ष पदावर कार्यरत असताना शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. नगरपरिषद प्रशासनात पारदर्शकता ठेवत नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्या कार्यकाळात शहरातील रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर विकासकामांना गती मिळाल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते.

ते स्वभावाने अत्यंत मनमिळावू, शांत व सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. समाजातील सर्व घटकांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध जपले होते. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व जाजू कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button