मुखेड तालुक्यातील जांब येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ समाधान शिबिर उत्साहात संपन्न; नागरिकांच्या समस्यांचे जागीच निवारण

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ दि १४ मार्च २६
शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर‘ टप्पा क्र. १ अंतर्गत, मुखेड तालुक्यातील जांब बु. येथील जिल्हा परिषद शाळेत आज दि. १४ मार्च २०२६ रोजी भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महसूल आणि इतर विभागांमार्फत नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप करून त्यांच्या तक्रारींचे जागीच निवारण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी प्रमोद बिराजदार यांनी केले. यावेळी मुखेडचे तहसीलदार राजेश जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अकृषिक (NA) परवानगी रद्दकरण्याबाबतच्या अद्ययावत सुधारणा आणि एकवेळचे अधिमुल्य भरण्याच्या नवीन व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना‘ आणि जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबतच्या नियमावलीवरही त्यांनी प्रकाश टाकला.

या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ त्वरित देण्यात आला. यामध्ये ७/१२ अभिलेखांमधील दुरुस्ती करून नवीन ७/१२ वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना लागणारे उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र आणि नॉन–क्रिमीलेअरप्रमाणपत्रांचे वाटप झाले.

डिजिटल ७/१२ कसा डाउनलोड करावा, याचे प्रात्यक्षिक महाभूमी पोर्टलद्वारे दाखवण्यात आले.
‘एक खिडकी‘ योजनेअंतर्गत अॅग्रीस्टॅक, ई–मोजणी, पीएम किसान आणि इतर तक्रारींचे निवारण करण्यात आले.
यावेळी शिबीरास राजेश जाधव तहसिलदार मुखेड, ढवळे गट विकास अधिकारी पंचायत समिती मुखेड, लोखंडे भूमी अभिलेख मुखेड, बोदमवाड एल.जी. तालुका कृषी अधिकारी मुखेड, डॉ. देशमुख तालुका आरोग्य अधिकारी मुखेड, डॉ. केंद्रे सहायक आयुक्त तालुका पशुवैदयकीय कार्यालय मुखेड, डॉ. मुकींकर पशुधन विकास अधिकारी मुखेड, निलेश रोहनकर पुरवठा निरीक्षक मुखेड, महाडीवाले के. व्ही. महसुल सहायक मुखेड, फड एस .एम मंडळ अधिकारी जांब बु, वाडीकर ग्रा.म.अ. रावी, शिंदे ग्रा.म.अ. जांब बु, चिंचोरे ग्राम महसुल अधिकारी सावरगाव, ठुबे ग्रा.म.अ वर्ताळा, नागेश्वर ग्रा.म.अ दापकाराजा, कांबळे ग्रा.म.अ होंडाला, वाघमारे ग्रा.म.अ. कामजळगा, श्रीकांत श्रीरामे ओपेरटर, पवन शिरबरतळ ओपेरटर, जि प शाळा जांब बु चे मुख्याध्यापक संजय थोटे, जांब बु मंडळातील सर्व गावातील सरपंच, ग्रामसेवक, महसुल सेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी कर्मचारी, व इतर नागरीक उपस्थित होते.



