छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी दोषीवर कार्यवाई करा, शिवप्रेमीची मागणी

मुखेड // प्रतिनिधीः
मालवण येथील राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा निकृष्ट दर्जाचे काम करून उभा केल्यामुळेच पुतळ्याची आवमानना झाली. या कामात जो कोणी दोषी आढळून येईल त्यावर कार्यवाही करावी अशी मागणी मुखेड तालुक्यातील शिवप्रेमी यानी केले. मालवण येथील राजकोट किल्यावरील छत्रपती राजे शिवाजी महाराजांचा पुर्ण कृती पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळेच महाराजाचा पुतळा जमिनीवर कोसळला त्यामुळे शिवप्रेमीच्या भावना अत्यंत तीव्र आहेत जे कोणी हा पुतळा बनवण्यात भृष्ट्राचार करण्यात आले त्यात जबाबदार व्यक्ती कोणीही असतील त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी आपल्या राजकिय स्वार्थ पोटी पुतळा कमकुवत करून आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. परंतू महाराजाचा अवमान झालेल आहे त्यामुळे राज्यातील शिवप्रेमी तर्फे या घटणेचा जाहीर निषेध करत लेखी निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे. यावेळी अॅड. गोविंद डूमने, संतोष पाटील इंगोले, अॅड. गजानन भोसले, सुरेश पाटील बेळीकर, दिनेश पाटील केरुरकर, माधव पाटील होंवडजकर, सुधाकर शिंदे, विठ्ठल शिंदे सह शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते..



