आज नांदेडमध्ये पावसासाठी विशेष प्रार्थना; ईदगाह देगलूरनाका येथे नमाज-ए-इस्तिस्का

श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क नांदेड दाऊत शेख :- ११ सप्टेंबर २६
मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिली असून, पावसाळ्याचे जवळपास तीन महिनेउलटूनही अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढलीआहे.
या पार्श्वभूमीवर पावसासाठी अल्लाहकडे विशेष प्रार्थना करण्याची नमाज–ए–इस्तिस्का अदा करण्यातयेणार आहे. शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता देगलूरनाका येथील ईदगाह मैदानावर हीविशेष नमाज अदा केली जाणार आहे.
नमाज–ए–इस्तिस्का ही पाऊस पडावा आणि जनजीवनाला दिलासा मिळावा, यासाठी अल्लाहकडे विशेषदुआ व प्रार्थना करण्याची नमाज आहे. सध्याच्या पावसाच्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाकडून ही प्रार्थना करण्यात येत आहे.
या विशेष नमाजमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पावसासाठी दुआ करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नमाजसाठी येताना वजू करून यावे, इस्तिगफार करावा, सदका–खैरात करावी आणि साध्या पोशाखात उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पाऊस हा प्रत्येकाच्या जीवनाशी आणि शेतीशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे नांदेड आणि मराठवाड्यात समाधानकारक पाऊस पडावा, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि सर्व नागरिकांचे जीवनसुखकर व्हावे, या सद्भावनेने ही विशेष प्रार्थना करण्यात येत आहे.
ही अपील मौलाना मोहम्मद साद अब्दुल्ला साहेब नदवी, मौलाना सरवर कासमी, मौलाना मोहम्मद तैय्यब साहेब नदवी, मौलाना मोहम्मद सिद्दीक साहेब नदवी, फाजली मोहम्मद जावेद साहेब तसेच शहरातील सर्व उलेमा व हाफिज यांच्या वतीने करण्यात आली आहे.



