बोगस शिक्षक भरतीसंदर्भात विशेष चौकशी समिती नेमणार : शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई : ०४ जुलै २५
राज्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्य समावेश करुन वेतन अदाकेले जात असल्याचे प्राथमिक चौकशीमध्ये निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेतामुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन अधिवेशन संपल्यानंतर एका महिन्यात आयएएस, आयपीएस, आणि न्यायव्यवस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष चौकशी समिती नेम ली जाईल. तसेच या समितीच्या चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरयांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य सुधाकर अडबाले यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, एकनाथ खडसे, संदीप जोशी, डॉ. परिणयफुके, डॉ. मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला. राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, शिक्षकांची भरती प्रक्रिया हीनियमाप्रमाणेच होते. त्यास शासन नियम ाप्रमाणेच मान्यता देते. तथापि भरतीमध्ये आर्थिक व्यवहारहोऊन नियमबाह्य भरती झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर निश्चित कारवाई केली जाईल. तसेच असेप्रकरण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी प्रलंबित ठेवले असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर देखीलकारवाई करण्यात येईल असेही त्यांनी याबाबतच्या उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले



