सामाजिक

पोलीस पाटलाला पदावरून हटवण्याची मागणी

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड : १५ सप्टेंबर २६

मुखेड तालुक्यातील वडगाव येथील पोलीस पाटील स्वतःच्या गावात न राहता उदगीर येथे वास्तव्यास असून, तेथे एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस पाटलाची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ पदावरून हटवावे, अशी मागणी वडगावचे नागरिक मारोती नळगिरे यांनी मुखेडचे तहसीलदार आणि नांदेडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शासनाच्या नियमानुसार पोलीस पाटलाने स्वतःच्या कार्यक्षेत्रात (गावात) राहणे बंधनकारक असते. मात्र, संबंधित पोलीस पाटील गावात राहत नसल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच, ते दुसऱ्या ठिकाणी खाजगी नोकरी करत असल्याने त्यांच्या मूळ पोलीस पाटील पदाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी स्वतः वडगाव येथे येऊन पोलीस पाटलाच्या वास्तव्याबाबत वनोकरीबाबत प्रत्यक्ष चौकशी करावी. या चौकशीत नियमबाह्य बाबी आढळल्यास त्यांच्यावर तत्काळ बडतर्फीची कारवाई करावी, जेणेकरून ग्रामस्थांची अडचण दूर होईल. प्रशासनाने या प्रकरणाची योग्यती दखल घेऊन कारवाई न केल्यास, यापुढे तीव्र उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही मारोती नळगिरेयांनी प्रशासनाला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button