उद्या मुखेड येथे लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेचा आयोजन

▫️सचिन साठे यांची विशेष उपस्थिती
मुखेड (प्रतिनिधी)
लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या ५६ व्या स्मृती दिनानिमित्त दि.१८ जुलै रोजी सचिन साठे यांच्या उपस्थितीत मुखेड येथे डॉ अण्णा भाऊ साठे क्रांती सेने च्यावतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ अण्णा भाऊ साठे क्रांती सेना मुखेड तालुक्याच्या वतीने लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठेयांच्या ५६ व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता कै.गोविदराव राठोड क्रीडा संकुल मुखेड येथे सभागृहात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे, राष्ट्रीय सचिव गणेश भगत ,प्रमुख पाहुणे आमदार डॉ तुषार राठोड, आमदार जितेश आंतापुरकर, माजी आमदार अविनाश घाटे, टी.एन.कांबळे, प्रदेश अध्यक्ष राज क्षिरसागर, शिवा कांबळे,माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत घाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य जे टी.भंगारे , डी. एन, शेळके, प्राचार्य मनोहर तोटरे, माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड , सरपंच दिगांबर गवलवाड , जेष्ठ कार्यकर्ते सखाराम बा–हाळीकर , जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोयणर आदी उपस्थित राहणार आहेत,
मुखेड येथे होत असलेल्या अभिवादन सभेसाठी तालुक्यात गाव भेटी घेऊन मोठ्या प्रमाणात प्रचार अणि प्रसार सर्व पदाधिकारी, समाजबांधव करीत आहेत, या कार्यक्रमात. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक तथा प्रबोधनकार व्यंकट सोनटक्के यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. अभिवादन सभायशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष जयसिंग कांबळे, कोडीबा वळगे, बालाजी कमळीकर, उतमवाघमारे, आनंद घाटे, शिवाजी कांबळे, दिपक तोटरे , विजय कांबळे, श्रीनिवास जांबळीकर,प्रल्हाद गायकवाड उमरदरीकर आदी परीश्रम घेत आहेत.



