हिमायतनगरची सुकन्या सबीना खानम १२ वी च्या परीक्षेत तालुक्यात प्रथम; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

▫️हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाचा झेंडा फडकला; ७३.६७ टक्के गुण मिळवून मिळविले यश
हिमायतनगर प्रतिनिधी – अजीम हिंदुस्तानी): २ मे २६
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १२ वी च्यापरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी सबीना खानम शब्बीर खान हिने दैदिप्यमान यश संपादन करततालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
सबीना खानम ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ कार्यकर्ते शब्बीर खान अहमद खान यांची कन्या आहे. तिने आपल्या कष्टाच्या जोरावर विविध विषयांत उल्लेखनीय गुण मिळवले आहेत. सबीनाचे विषयनिहाय गुण खालीलप्रमाणे आहेत:
इंग्रजी: ६८ हिंदी: ८३ फिजिक्स: ५४ केमिस्ट्री: ६८ बॉयोलॉजी: ७१ ॲग्रीकल्चर: ९८ (विशेष प्राविण्य)एकूण ७३.६७ टक्के गुण मिळवून ती तालुक्यात प्रथम आली आहे. विशेषतः ॲग्रीकल्चर (कृषी) विषयात तिने ९८ गुण मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सबीना खानम हिच्या या यशाबद्दल हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने तिचा विशेषसत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंदाच्या उपस्थितीत तिलाशाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी तिचे वडील शब्बीर खान हे देखील उपस्थित होते.
तिच्या या यशाबद्दल राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील मुली जिद्दीच्या जोरावर उच्च शिखरे सर करू शकतात, हे सबीनाने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन देशसेवा करण्याचा मानस सबीनाने यावेळी व्यक्त केला.




