Uncategorized

९१ मुखेड विधानसभा एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; शेवटच्या दिवशी ०६ जणांनी घेतली माघार

मुखेड प्रतिनिधी:- 

राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला याचा निकाल लागणार आहे. दिनांक ०४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत शेवटचा दिवस होता उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दिनांक. ०४ नोव्हेंबर रोजी ९१-मुखेड विधानसभा मतदार संघासाठी होणा-या निवडणुकीसाठी नामनिर्देशन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकुण ६ उमेदवारानी आपली उमेदवारी मागे घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुप पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. आज कोणत्या पक्षातले किती आणि कोणी अर्ज मागे घेतला आहे चला जाणून घेऊया.

१. अॅड. देवानंद तुळजीराम देशमुख

२. परसराम दत्ता कदम

३. प्रकाश चांदोबा गवलवाड

४. शिवाजी नागोराव जाधव

५. डॉ. श्रीहरी राजाराम बुडगेमवार

६. सतिश लक्ष्मण कावडे

उर्वरित ११ उमेदवार व् त्यांना मिळालेले चिन्ह खलील प्रमाणे आहेत..

१) अहिल्याबाई हनमंत मामिलवाड (ठाणेकर)  (हती)

२) तुषार गोविंदराव राठोड (कमळ)

३) बेटमोगरेकर हनमंतराव व्यंकटराव पाटिल (हाताचा पंजा)

४) कल्पना संजय गायकवाड (माइक)

५) गोविंदराव दादाराव डूमने (गन्ना किसान)

६) रावसाहेब दिगाबरराव पाटिल (गॅस सिलेंडर)

७) राहुल राजू नावंदे (बॅट)

८) रुक्मिणबाई शंकरराव गित्ते (ट्रक)

९) विजयकुमार भगवानराव पेठकर (शिट्टी)

१०) बालाजी नामदेवराव पाटिल खतगावकर (शिवन यंत्र)

११) संतोष भगवान राठोड (आटो रिक्षा)

 दिनांक. ४ नोव्हेंबर रोजी ९१-मुखेड विधानसभा मतदार संघासाठी होणा-या निवडणुकीसाठी मुख्य निवडणुक निरीक्षक रण विजय यादव यांनी निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालय मुखेड येथे भेट देऊन निवडणुक कामी नियुक्त केलेल्या पथक प्रमुखाची बैठक घेउन होत असलेल्या कामाचा आढावा घेतला व् निवडणुक पारदर्शक पार पाड़नेसाठी मार्गदर्शक सुचना दिल्या. त्यानंतर त्यांनी स्ट्रॉग रुमची पाहणी केली त्यानंतर मतदान कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात येणा-या स्थळ येथे भेट दिली व मार्गदर्शन केले. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी अनूप पाटिल सहा. निवडणुक अधिकारी राजेश जाधव व् सहा. निवडणुक तानाजी चव्हाण विविध पथकाचे प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button