राजकीय

लातूर रोड-बोधन’ रेल्वे मार्गाला तातडीने मंजुरी द्या आणि निधी वितरित करा; खासदार रवींद्र चव्हाणयांची संसदेत आग्रही मागणी

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ १८ मार्च २६

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी संसदेत मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नावर आवाज उठवतलातूर रोड – जळकोट – मुखेड – बोधन या नवीन रेल्वे मार्गाला तातडीने प्रशासकीय मंजुरी देऊन त्यासाठी भरीव निधी वितरित करण्याची मागणी केली आहेया मागणीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रेल्वे प्रकल्पाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

हा प्रस्तावित रेल्वे मार्ग केवळ प्रवासाचे साधन नसून तो महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांना जोडणारा एक महत्त्वाचा आर्थिक दुवा ठरणार आहेलातूर रोड पासून सुरू होणारा हा मार्ग जळकोट आणि मुखेड यांसारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागातूनजात थेट तेलंगणातील बोधनला जोडला जाणार आहेयामुळे मराठवाड्याचा दक्षिण भारताशी संपर्क अधिक सुलभ होईल.

या रेल्वे मार्गामुळे मुखेड आणि जळकोट तालुक्यातील शेतीमालाच्या वाहतुकीला मोठी गती मिळणार आहेया भागातील व्यापारीविद्यार्थी आणि नोकरदारांना सध्या रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागतेज्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो.

हैदराबाद आणि दक्षिण भारताकडे जाण्यासाठी अंतर कमी होईल.

स्थानिक बाजारपेठांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल.

उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

खासदार प्रारवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात या मार्गाच्या सर्वेक्षणाची सद्यस्थिती आणि आवश्यकनिधीचा मुद्दाही उपस्थित केला. “अनेक वर्षांपासून या मार्गाची मागणी होत आहेमात्र तांत्रिककारणांमुळे हा प्रश्न प्रलंबित आहेकेंद्र सरकारने याकडे विशेष लक्ष देऊन आगामी अर्थसंकल्पात यामार्गासाठी भरीव तरतूद करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

खासदार चव्हाण यांच्या या पुढाकारामुळे नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहेजिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वेचे जाळे विस्तारणे ही काळाची गरज असूनया प्रश्नाचा आपण पाठपुरावा करत राहूअसा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

रेल्वे मंत्रालयाने या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद दिल्यासमराठवाड्याच्या रेल्वे नकाशावर एक नवा आणि महत्त्वपूर्ण अध्याय जोडला जाणार आहे.

खासदार रवींद्र चव्हाण यांनी संसदेत रेल्वे प्रश्नावर आवाज उठवत लातूर रोड – जळकोट – मुखेड – बोधनया नवीन रेल्वेची मंजुरी व निधी वितरित करण्याची  मागणी केल्या बदल रेल्वे संघर्ष समिती मुखेडच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button