सामाजिक

लातूर रोड–बोधन रेल्वेसाठी मुखेडात रणशिंग! संघर्ष समितीचा एल्गार; अध्यक्षपदी दिलीप कोडगिरे यांची निवड

मुखेड: (प्रतिनिधी) श्रमिक एकता न्यूज़ १८ मार्च २६

गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या लातूर रोडमुखेडबिलोलीबोधन या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गासाठी आता आरपारची लढाई लढण्याचा निर्धार मुखेडकरांनी केला आहेमंगळवार१७ मार्च२०२६ रोजी मुखेड येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या निर्णायक बैठकीत रेल्वे संघर्ष समितीचीघोषणा करण्यात आली असूनसमितीच्या अध्यक्षपदी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप श्रीराम कोडगिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहेया निवडीमुळे आता रेल्वेच्या लढ्याला नवी धारचढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजकारण बाजूला, आता केवळ विकास!

माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण शेठमहाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत उपस्थितांचा संताप अनावर झाला होता. “रेल्वेअभावी मुखेड तालुक्याचा विकास खुंटला आहेलोकप्रतिनिधींनी आतापर्यंत केवळ आश्वासनेदिली आहेत,” अशा तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्याया मार्गासाठी आता कुणाच्याहीदावणीला  बांधले जाताराजकारण बाजूला ठेवून वज्रमुठ आवळण्याचा निर्धार यावेळी करण्यातआला.

अशी आहे संघर्ष समितीची ‘फळी’

रेल्वेच्या या लढ्याला ताकद देण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतील अनुभवी व्यक्तींची कार्यकारणीजाहीर करण्यात आली आहे:

प्रमुख मार्गदर्शक पदी अरुण शेठ महाजनडॉमाधवराव पाटील उच्चेकरमल्लिकार्जुन एकाळेबालाजीबंडेविठ्ठलराव इंगळे.

सल्लागार पदी ॲडसुनील पौळकरडॉश्रावण रॅपनवाडॲडविजय कोत्तापल्ले.

कार्याध्यक्ष पदी डॉव्यंकट माणिकराव भोसले (सुभेदार) 

सचिव पदी ज्ञानेश्वर बालाजीराव डोईजड.

उपाध्यक्ष पदी दत्तात्रय चौधरीसंभाजी पाटील उंदरीकरआसद बल्खी श्रीमती अल्काताई चिद्रे.

सहसचिव पदी सचिन देबडवारसुधाकर जाधव.

कोषाध्यक्ष पदी अण्णासाहेब जाहीर जुनेकर.

संघटक पदी शेखर पाटीलशिवशंकर पाटील कलंबरकर.

सहसंघटक पदी सुनील पाटील तरगुडे 

प्रसिद्धीप्रमुख पदी अनिल कांबळेबबलू मुल्लानामदेव श्रीमंगलेविठ्ठल पाटील येवतीकर.

सदस्य पदी संजय मुक्कावारसुभाष जांभळीकरशादुल होनवडजकरसंजय यलमवाडगोविंद वाडेकरयांची निवड करण्यात आली.

“लढा आता घराघरांत पोहोचणार”

यावेळी बोलताना नवनियुक्त अध्यक्ष दिलीप कोडगिरे यांनी ठणकावून सांगितले की, “हा लढा केवळकागदोपत्री  राहता तो रस्त्यावर येईलपहिल्या टप्प्यात आम्ही लोकप्रतिनिधींना भेटून आमची भूमिकामांडूमात्र जर शासनाने आमच्या न्याय्य मागणीकडे दुर्लक्ष केलेतर संपूर्ण तालुक्यात तीव्र जनआंदोलनउभे केले जाईलरेल्वे मिळेपर्यंत आता माघार नाही!”

या बैठकीस नामदेव जाधवहरिदास सूर्यवंशीमारुती जांभळीकरपद्माकर पाटील यांच्यासह शेकडोकार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होतेया समितीच्या स्थापनेमुळे रेल्वेच्या मागणीलाआता एक संघटित आणि आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button