Uncategorized

नानक साई फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार डॉ. श्रावण रॅपनवाड यांना घोषित

मुखेड दि.28 जाने

    नानक साई फाउंडेशनचा प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्कार येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्रावण रॅपनवाड घोषित झाला असून परिसरात त्यांचे अभिनंदन होत आहे.

     पंजाब मधील घुमान यात्रेसाठी संपूर्ण नियोजन लावणारे सुप्रसिद्ध पत्रकार पंढरीनाथ बोकारे हे अध्यक्ष असणाऱ्या नानक साई फाउंडेशन नांदेड यांच्या वतीने दरवर्षी साहित्य संमेलन घेतले जाते. वेगवेगळ्या प्रांतात दरवर्षी होणाऱ्या साहित्य संमेलनातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्ता व संस्थांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. फाउंडेशनचे अध्यक्ष पंढरीनाथ बोकारे आणि घुमान साहित्य सभा चे अध्यक्ष डॉक्टर गजानन देवकर यांच्या स्वाक्षरीने रॅपनवाड यांना पत्राद्वारे तसे कळवले आहे.पत्रात म्हटले आहे की,यावर्षी नांदेड येथे रविवार,4 फेब्रुारी 2024 रोजीनानक साई फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनात अधिक कार्याची दखल घेऊन डॉ. श्रावण रॅपनवाड यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार 

 आहे.

     डॉ.श्रावण रॅपनवाड विविध सामाजिक उपक्रम राबविणारे क्रियाशील कार्यकर्ते आहेत. ते अतिशय कष्टकरी वडार समाजाचे असून राजकीय क्षेत्रातही धडपडया कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. यापूर्वी विविध पुरस्काराने सन्मानित डॉ.श्रावण रॅपनवाड हे काँग्रेस प्रदेश सचिव असून मागील वर्षीच्या ‘भारत जोडो यात्रेत’ त्यांनी खा.राहुल गांधींसमवेत पाच महिने राहून ४ हजार ८० किलोमीटर पदयात्रा पूर्ण केली आहे. डॉ.श्रावण रॅपनवाड यांना पुरस्कार घोषित होताच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ.अमरनाथ राजूरकर, माजी आ.अविनाश घाटे माजी आ.हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, युवक काँग्रेस विधानसभाध्यक्ष संतोष बोणलेवाड, नंदकुमार मडगुलवार,मराठवाडा भूषण डॉ. दिलीप पुंडे,डॉ.अशोक कौरवार,डॉ.रामराव श्रीरामे, अदनान पाशा आदींसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button