सामाजिक

मुखेडमध्ये वैचारिक जागर: ज्येष्ठ विचारवंत शिवश्री गंगाधर बनबरे यांचे आज व्याख्यान

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १२ एप्रिल २६

क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त मुखेडशहरात वैचारिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहेया महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ विचारवंत शिवश्री गंगाधर बनबरे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

आज १२ एप्रिल (रविवार) वेळ: सायंकाळी :०० वाजता स्थळ: डॉबाबासाहेब आंबेडकर स्मारकमुखेड फुलेआंबेकर संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवता विचारमंचाचे प्रमुख बालाजी लिंगनवाड हे असतीलकार्यक्रमाचे उद्घाटन इंजि. राजेंद्र वाघमारे आणि प्रा. उत्तमकुमार कांबळे यांच्या हस्ते पार पडणार आहे.

याप्रसंगी नगरसेवक प्राविनोद आडेपवार, शेकापचे अ‍ॅडगोविंद पाडुमणेप्रभाकर पाटील तांदळीकर,उपसरपंच गणेश पाटील बेळीकरशेतकरी  नेते शिवशंकर पाकलंबरकरहणमंत पाइंगोलेप्रताप पाचौधरीकॉशंकर बादावाडपवन कांबळे येवतीकरउमेश पाटील आडलुरकरपंडित ढवळेयोगेश मामीलवाडभाई असद बल्कीकुलदीप कोत्तापल्ले यांसह विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

महामानवांच्या विचारांवर आधारित प्रबोधनात्मक समाज निर्मितीसाठी मुखेडमध्ये दरवर्षी ही व्याख्यानमाला आयोजित केली जातेज्येष्ठ नेते दशरथराव लोहबंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात असूनयावर्षी देखील शहरात वैचारिक प्रबोधनाचा जागर पाहायला मिळणार आहे.

या कार्यक्रमास मुखेडमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेअसे आवाहन समितीचे निमंत्रक अनिल बनसोडे  आशुतोष कांबळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button