राजकीयसामाजिक

एसएफआयचे २५ वे नांदेड जिल्हा अधिवेशन मुखेड येथे संपन्न

मुखेड (ता२९) प्रतिनिधी

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)चे २५ वे नांदेड जिल्हा अधिवेशन दि.२८ मे रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड शहरात संपन्न झाले.

या वेळी शहीद भगतसिंग यांना अभिवादन करून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली. 

अधिवेशनाचे उद्घाटन एसएफआयचे माजी नेते आणि डीवायएफआयचे अंकुश माचेवाड यांनी केलेअधिवेशनास एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी संबोधित केले तर शेतमजूर युनियनचे नेतेकॉविनोद गोविंदवार यांनी अधिवेशनाला शुभेच्छा दिल्याअधिवेशन उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानीविजय लोहबंदे होते तर प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रफुल्ल कऊडकर यांनी केले.

अधिवेशनाच्या प्रतिनिधी सत्रात संघटनेचा कार्यात्मकसंघटनात्मकआंदोलनात्मक आणि शैक्षणिकपरिस्थितीचा आढावा घेणारा अहवाल मांडण्यात आलात्याआधी शोक ठराव घेऊन आदरांजलीवाहण्यात आलीअधिवेशनात वेगवेगळे ठराव पारित करण्यात आलेनवीन शैक्षणिक धोरण २०२० रद्दकरासर्व विद्यार्थ्यांना बस प्रवास निशुल्क कराशासकीय आयटीआयचे खाजगीकरण थांबवाजिल्हापरिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी लढा तीव्र कराविद्यार्थिनी  महिला अत्याचार विरोधी लढा तीव्र करायासहित विविध ठराव एकमताने या अधिवेशनात पारित करण्यात आले.

या अधिवेशनाने एसएफआयची १८ सदस्यांची नवीन जिल्हा कमिटीची निवड केलीयामध्येएसएफआयचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष म्हणून विजय लोहबंदे आणि जिल्हा सचिव म्हणून मीनाआरसे यांची एकमताने निवड करण्यात आलीजिल्हा उपाध्यक्षपदी प्रफुल्ल कऊडकर  स्वप्नील बुक्तरेतसेच जिल्हा सहसचिवपदी पवन जगडमवार  विकास गायकवाड यांची निवड करण्यात आलीजिल्हाकमिटी सदस्य म्हणून अक्षय सागरेसाहेबराव सोनसाळेनितीन सोनकांबळेअमोल गायकवाडसोनलपाईकरावनेहा कऊडकरभारत पवारशरद खंदारेभीमराव सोनकांबळे यांची निवड करण्यात आलीआहे जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.

अधिवेशनात जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयातून ८६ प्रतिनिधी सहभागी झाले होतेसमारोपप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा सचिव आणि अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले. ‘हम होंगे कामयाब‘ या गीताने अधिवेशनाचा समारोप झालाअधिवेशन यशस्वी करण्यासाठी मुखेड तालुक्यातीलएसएफआयच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button