सामाजिक

शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी केंद्रातुनच खत, बियाणे खरेदी करावे:- कृषी अधिकारी नारनाळीकर

मुखेड -(ताप्रतिनिधी)

चालू वर्षातील खरीप पिकांसाठी तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांनी खात, बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी शासन मान्यता कृषी निविष्ठाचा विक्री परवाना असलेल्या कृषी केंद्रातूनच खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागाचे मुखेड तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर यांनी केले आहे.

मुखेड तालुक्यासह मुक्रमाबादबाराहाळीजांब परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना कृषी विभागाकडूनआवाहन करण्यात येते कीखरीप हंगाम तोंडावर आलेला असून या हंगामाकरीता लागणाऱ्या सर्व कृषीनिविष्ठा (सर्व प्रकारचे बियाणेखतेऔषधीइत्यादी निविष्ठा तालुक्यातील अधिकृत परवानाधारक कृषी सेवा केंद्र यांच्याकडूनच खरेदी करावे  खरेदी केलेल्या निविष्ठाची अधिकृत बिल पावती घ्या महत्त्वाचेम्हणजे बाहेर राज्यातीलबाहेर जिल्ह्यातील किंवा बाहेर तालुक्यातील कुठल्याच अनधिकृतएजंट मार्फत खरीप हंगामा करिता लागणाऱ्या कृषी निविष्ठाची (सर्व बियाणेखतेऔषधीइत्यादी निविष्ठांची खरेदी करू नयेकारण सदरी कृषी निविष्ठा ही निकृष्ट दर्जाची राहू शकते त्यामुळे बियाणेउगवण बाबतखाते  औषधी यांची पिकाकरिता पुरेसा उपयोग  होणेयाबाबतीत तक्रारी येऊ शकतातत्यामुळे उत्पादनात घट होऊन परिणामी आपले आर्थिक नुकसान होऊ शकते

शेतकऱ्यांनी रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी. यासाठी पक्क्या विलाचाच आग्रह धरावा.

विक्रेता पक्के बिल देण्यास नकार देत असल्यास किंवा इतर कुठलीही शंका तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी, किंवा पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून तक्रार नोंदवावी. बिलावर खरेदी केलेल्या बियाण्याच्या गुणवतेचा संपूर्ण तपशील नोंदविलेला आहे क्रिया नाही याची खात्री करावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे पॉकीट सीलबंद , मोहरबंद तथा लेबलसह असल्याची खात्री करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेचा अंतिम मुदतीचा दिनांक पाहूनच पॉफीट किया बैंक खरेदी करावी. एमआरपी पेक्षा जास्त किमतीने विक्री होत असल्यास त्वरित कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी. रासायनिक खत खरेदी करताना बॅग वरील एमआरपी किमत बघूनच खरेदी करावी. जर कोणताही व्यक्ती अथवा संस्था बेकायदेशीर पद्धतीने बोगस बियाण्याची, खताची विक्री

करताना आढळल्यास त्याच्याविरुद्ध बियाणे नियंत्रण आदेश १९८३ रासायनिक खत नियंत्रण आदेश १९८५ अंतर्गत तरतुदीप्रमाणे कारवाई केली जाईल. अशी बोगस बियाणे व खते विक्रीचा बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यास तात्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा गैरप्रकार आढळल्यास त्वरित तक्रार करा असे आवाहन मुखेड तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button