Uncategorized

शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगेंनी दिली जि.प.मुलींचे हायस्कूलला भेट.

मुखेड / प्रतिनिधी.

नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डाॅ.सविता बिरगे यांनी मुखेड येथे सुरु असलेल्या शिक्षकांच्या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० या तालुकास्तरिय प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन करण्यासाठी तसेच परिक्षा केंद्राना भेटी देण्यासाठी आल्या होत्या येथील भेटीनंतर त्यांनी मुखेड शहरातील पिएमश्री,आदर्श शाळा,जि.प. मुलींचे हायस्कूलला भेट देवुन तेथील विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शाळेचे व्यवस्थापन याबाबत कौतुक करीत समाधान व्यक्त केले.प्रशालेच्या वतीने शिक्षणाधिकारी बिरगे यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षणाधिकारी यांनी जि.प.मुलींचे हायस्कुलचा परिसर,विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शालेय ग्रंथालयाचा कार्यक्षम वापर,विद्यार्थ्यांची बँक, प्रोजेक्टरद्वारे शिकवणी,वृक्ष लागवड व त्याचे संगोपन, परसबागमध्ये विविध प्रजातीचे वृक्ष व भाजीपाला,सुसज्ज नविन इमारतीचे काम, सोलार कॅम्प, वाॅटर फिल्टर मशीन (आरओ) च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची सोय,विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्गात फॅन ची सोय, बसण्यासाठी आसन व्यवस्था, विविध शैक्षणिक उपक्रमात सहभाग,यासह विविध क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवणारी नामांकित शाळा म्हणुन सर्वदूर परिचित असलेल्या प्रशालेबाबत सविता बिरगे यांनी कौतुक करीत समाधान व्यक्त केले तसेच शाळेच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे चांगल्या कार्याबद्दल अभिनंदन केले.यावेळी प्रशिक्षणार्थी उपशिक्षणाधिकारी प्रिया डहाळे, गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे, समग्र शिक्षा अभियान विभागप्रमुख डाॅ.दादाराव शिरसाठ,शिक्षण विस्तार अधिकारी डाॅ.शिवाजी कराळे, बाळासाहेब कदम,राज्य पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक जि.सी.चव्हाण,केंद्रप्रमुख उत्तम चव्हाण,केंद्रप्रमुख श्रिपत वाडीकर, माजी केंद्रप्रमुख मधुकर गायकवाड,शिक्षक नेते तथा सांस्कृतिक विभागप्रमुख दिलीपराव देवकांबळे, शिक्षक नेते दिपकराव लोहबंदे, श्रिमती आशालता स्वामी, डाॅ. बरकत्तउल्ला,विश्वाभंर जाधव, हरी भालेराव,सौ.सुनिता आलमले,सुचिता कुलकर्णी, अंबादास देशमुख,पंढरी भालेराव,नागनाथ स्वामी,हरी पवार,सुरेखा हराळे,चंद्रकांत डावकरे,शामसुंदर दारकु,जीवन वडजे,भवानिसिंह चौव्हाण, अकबर सय्यद,बोईनवाड बाई, केळे बाई यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button