सामाजिक

भाई आसद बल्खी यांच्या ‘रोखठोक’ इशाऱ्याला यश! मुखेड प्रभाग क्र. ९ मध्ये नाल्यांची सफाई आणि बंद पथदिवे दुरुस्तीचे काम अखेर सुरू

मुखेड प्रतिनिधी:- श्रमिक एकता न्यूज़ २९ मे २६

प्रभाग क्रमांक ०९ मधील नागरी समस्यांवरून नगर परिषद प्रशासनाला  दिवसांचा ‘अंतिमइशारादेताच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहेराज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई आसद इब्राहिम बल्खी यांनी दिलेल्या तीव्र आंदोलनाच्या इशाऱ्यानंतरमुखेड नगर परिषदेने प्रभागातील तुंबलेल्या नाल्या उपसण्याचे आणि बंद पडलेले पथदिवे (स्ट्रीट लाईटतातडीने दुरुस्त करण्याचे काम प्रत्यक्ष जमिनीवर सुरू केले आहेत्यामुळे प्रभाग क्रमांक ०९ मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून भाई आसद बल्खी यांच्या आक्रमक भूमिकेला मोठे यश आले आहे.

प्रभाग क्रमांक ०९ मधील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून तुंबलेल्या नाल्याअंधाराचे साम्राज्य आणि बंद हातपंपांमुळे नरकयातना भोगत होतेया संदर्भात  मे २०२६ रोजी लेखी निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नव्हतीमान्सून तोंडावर आलेला असतानाही मान्सूनपूर्व स्वच्छता का झालीनाहीअसा थेट सवाल करत भाई आसद बल्खी यांनी ‘महाराष्ट्र दप्तर दिरंगाई अधिनियम२००५‘ चाहवाला देत मुख्याधिकाऱ्यांना थेट न्यायालयात खेचण्याचा  नगर परिषदेसमोर तीव्र ठिय्या आंदोलनकरण्याचा रोखठोक इशारा दिला होता.

या इशाऱ्याची गंभीर दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी तात्काळ पावले उचललीआज प्रभाग क्र०९ मध्येयुद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले

प्रशासनाने वेळेत दखल घेऊन काम सुरू केल्यामुळे प्रभाग क्रमांक ०९ मधील नागरिकांनी भाई आसद बल्खी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button