९१ मुखेड विधानसभा मतदारसंघात मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम; अचूक मतदार यादीसाठी BLA-2 ची भूमिका महत्त्वाची – अनुप पाटील

▫️ ३० जून ते २९ जुलै दरम्यान BLO घरोघरी जाऊन करणार मतदार नोंदणी; राजकीय पक्षांच्या BLA-2 चीतहसील कार्यालयात बैठक संपन्न.
मुखेड श्रमिक एकता न्यूज़ नेटवर्क:-
भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (२०२६) जाहीर केला आहे. या अनुषंगाने ९१ मुखेड विधानसभा मतदारसंघातील मतदारयाद्या अचूक करण्यासाठी राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या BLA-2 (Booth Level Agent) यांचीभूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन मतदार नोंदणी अधिकारी अनुप पाटील यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी २७ जून २०२६ रोजी मुखेड तहसील कार्यालयात सर्व राजकीय पक्षांच्याBLA-2 ची विशेष बैठक पार पडली.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, दिनांक ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत ९१मुखेड विधानसभा मतदारसंघातील ३६६ केंद्रस्तरीय अधिकारी (B.L.O.) घरोघरी भेटी देणार आहेत. याभेटीदरम्यान ते मतदारांना ‘Enumeration Form’ (परिगणन नमुना) वाटप करून ते भरून घेण्याचेकाम करणार आहेत.
या संपूर्ण प्रक्रियेत प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आणि BLO सोबत समन्वय ठेवण्यासाठी विविधराजकीय पक्षांनी आपले BLA-2 नियुक्त केले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीने ३६६, भारतीयराष्ट्रीय काँग्रेसने २८२, शिवसेनेने २६३ तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने २२३ BLA-2 नियुक्त केले आहेत.

तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या या बैठकीत, SIR कार्यक्रमात BLO आणि BLA-02 यांची नेमकीजबाबदारी काय असेल, यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदारसंघातील एकही पात्र मतदारयादीतून वंचित राहू नये आणि कोणत्याही अपात्र मतदाराचे नाव यादीत समाविष्ट होऊ नये, यासाठीBLA-02 यांनी दक्ष राहावे. तसेच, तात्पुरत्या स्वरूपात बाहेरगावी स्थलांतरित असलेल्या मतदारांमध्येजनजागृती करून त्यांचेही ‘Enumeration Form’ भरून घेण्याचे आवाहन अनुप पाटील यांनी याप्रसंगीकेले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला राजकीय पक्षांच्या वतीने भाजपचे BLA-01 शिवाजी राठोड आणि शिवसेनेचेबालाजी पाटील कबनुरकर उपस्थित होते. तसेच, प्रशासनाच्या वतीने निवडणूक नायब तहसीलदारसतीश जोहरे, महसूल सहाय्यक संदीप भुरे, लिपिक सुनील कुलकर्णी, डाटा एंट्री ऑपरेटर बबलू आतार, दफेदार गोपीनाथ पिंगळे आणि गणेश बंडे आदींची उपस्थिती होती.



