दबाव तंत्राचा वापर करून भु खंड हडप करण्याचा डाव
नांदेड प्रतिनिधी
शहरालगत असलेल्या मौजे वसरणी येथील गट नंबर 45 मधील हा भूखंड सर्वच कागदपत्राद्वारे माझ्या नावे असून तो भूखंड काही बोगस फ्लॅट धारक हे दबाव तंत्राचा वापर करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून हडप करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आरोप भूखंडाचे मालक संतोष मानधने यांनी केला आहे वसरणी
येथील गट नंबर 45 मधील भूकंडाचे सर्वच कागदपत्र मालकीचे असून तो भूखंड संतोष मांनधने यांनी खरेदी केल्या असून त्याबद्दल सर्वच पुरावे त्यांनी भूमी अभिलेख व मनपाला दिले आहेत कागदपत्राच्या आधार वरून खरे मालक संतोष मानधने असून सुद्धा काही जणांनी त्यावर अक्षेप घेऊन तो भूखंड आमचाच आहे असे अधिकाऱ्यांना सांगून त्यांच्यावर दबाव टाकत आहेत याबाबत मी हायकोर्टामध्ये अपील दाखल केली असून कोर्टाने त्यावर स्टे दिला आहे भूमी अभिलेख विभागांनी मूळ नकाशा हा संतोष मानधनेचा असून याचे मूळ मालक हेच आहेत असेही त्यांनी पत्र देऊन शासनाला कळवलेले आहे व महानगरपालिका यांनीही या भूखंडाचे मालक संतोष मानधनेच आहेत असे सांगून मालकी हक्क पत्र दिले आहे परंतु काही बोगस प्लॉट धारक दबाव तंत्राचा वापर करून आम्हीच मालक आहोत म्हणून भुखठामध्ये आमचेच प्लॉट आहेत असे सांगत आहेत त्यामुळे त्यांच्याकडून मला धमकही येत असून माझ्या जीवितांना त्यांच्यापासून धोका आहे माझे दोन वेळेस बायपास सर्जरी झालेले आहे त्यामूळे माझे काही बरे वाईट झाले तर हे बोगस प्लॉट धारकच या प्रकरणाला जबाबदार राहणार आहेत



