Uncategorized

संघर्षमय जीवनातील प्रवासाचा वाटसरु म्हणजे माझा मोठा भाऊ,माझा आधारस्तंभ – प्रकाश दत्ता सोनकांबळे बेटमोगरेकर

मुखेड /प्रतिनिधी:- २९ जून २५

मुखेड तालुक्यातील मौजे बेटमोगरा या ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आयु.प्रकाश दत्ता सोनकांबळे यांच्या संघर्षमय जीवनातील प्रवासाचा लेखाजोखा पुढीलप्रमाणे आयु.प्रकाश दत्ता सोनकांबळे यांचा जन्म दि.२९ जून १९८६ रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात आई सागरबाई दत्ता सोनकांबळे या दाम्पत्याच्या उदरी जन्म झाला.घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची तरीही मनात असलेली जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आयुष्य जगत असताना जीवनातील अनेक समस्या आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची वृत्ती या सारख्या त्यांच्यातील सुप्त गुणांना संघर्षमय जीवनातून वाटचाल करताना वाव मिळत गेला. आयु.सागरबाई दत्ता गंगाराम सोनकांबळे हे कुटुंब मूळतः नायगांव तालुक्यातील मौजे मुगाव येथील परंतु तत्कालीन परिस्थितीत बेटमोगरा हे गाव प्रसिद्ध बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असल्याने दत्ता गंगाराम सोनकांबळे यांनी आपल कुटुंब घेवून बेटमोगरा येथे स्थायिक झाले. मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा हाकताना वडील दत्ता सोनकांबळे यांना अनेकदा खस्ता खाव्या लागल्या. त्यांना एकूण पाच मुले त्यापैकी प्रकाश दत्ता सोनकांबळे हा कुटुंबातील अतिशय हुशार आणि कुटुंबातील आर्थिक परिस्थीतीची जाण असणारा त्यांनी आई वडिलांच्या संस्कराप्रमाने शिक्षणाचे धडे घेत आणि गुरुजनांप्रती व वडीलधाडील व्यक्तींचा आदर करणे त्यांच्याशी सन्मानजनक व प्रामाणिकपणे वागणे हे त्यांचा जणू नित्यक्रम.
आपल १२ वी.(विज्ञान) व बी.ए.ची पदवी प्राप्त करत त्यांचे लहान भाऊ गौतम सोनकांबळे,भगवान सोनकांबळे,व स्वाभिमान भारत न्यूज चे संपादक तथा निर्भीड पत्रकार भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांना ही शिक्षणाची कास धरायला लावली.
प्रकाश सोनकांबळे यांनी शिक्षण शिकत असताना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जे लागेल ते मोलमजुरी चे काम करून आई वडिलांसह कुटुंबात आर्थिक मदत करत. कालांतराने सन २००८- २००९ च्या दरम्यान गावाकडील वाढती बेरोजगारी लक्षात घेऊन पुणे शहरात कामकाजासाठी जावून सुरुवातीच्या काळात जे लागेल ते मोलमजुरी करुन गावाकडे कुटुंबाला आर्थिक आधार देत प्रकाश दत्ता सोनकांबळे यांनी आपल्या आयुष्याची वाटचाल करताना अनेक समस्या व संकटांना सामोरे जात सन २०११ते २०१४ च्या दरम्यान देशाची राजधानी दिल्ली सारख्या मोठ्या शहरात एका नामांकित कंपनीत उतरादेवी चॅरीटेबल ट्रस्ट व व्यंकीज प्रा.लि.कंपनीत कामकाज करण्याची नामी संधी स्वीकारली आणि पुन्हा तिथून नव्याने आयुष्याची वाटचाल करीत परिवाराला आर्थिक बळ देत आई वडिलांचा आधार आणि एकंदरीत कुटुंबाचा आधारवड बनला. याच प्रकाश दत्ता सोनकांबळे यांच्या छत्र छायेखाली त्यांचा लहान (धाकटा) भाऊ
निर्भीड पत्रकार तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष पत्रकार भारत सोनकांबळे बेटमोगरेकर यांनी ही आपल्या आयुष्याची वाटचाल करत सामाजिक,शैक्षणीक, राजकिय आणि पत्रकारिता क्षेत्रात अग्रेसर कार्यरत राहून मुखेड तालुक्यातच नाहीतर नांदेड जिल्हाभरात एक निर्भीड पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता म्हणून नावरुपाला आलेलं नाव आहे.
प्रकाश दत्ता सोनकांबळे यांनी आपल्या उभ्या आयुष्यात परिवारातील सर्व सदस्यांना विश्वासात घेवून सर्व भावंड त्यात वडील भाऊ ज्ञानेश्वर,गौतम,भगवान आणि पत्रकार भारत सोनकांबळे यांच्यासह चुलता,चुलती,चुलत बहीण आदिंसह कुटुंबातील सर्व व्यक्ती नातेवाईक यांना एकत्रित एका घट्ट नात्यात जपत सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने सुख दुःखाची विचारपूस करणारं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून बेटमोगरा येथील सोनकांबळे कुटुंबात प्रकाश दत्ता सोनकांबळे यांची ख्याती आहे.
प्रकाश सोनकांबळे यांनी शालेय जीवनातून च तथागत गौतम बुद्ध,राजा सम्राट अशोक,संत कबीर, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,छत्रपती राजर्षी शाहू राजे, भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे,माता यशोधरा, माता भिमाई,माँ.जिजाऊ, माता सावित्रीमाई फुले,माता रमाई आंबेडकर, माता अहिल्यादेवी या महापुरुषांच्या विचाराने व प्रेरणेने प्रेरित होऊन. बेटमोगरा येथील व परिसरातील बौद्ध समाजातील वाईट चाली रिती,अंधश्रद्धा, अज्ञान दूर करण्यासाठी परिवर्तनवादी चळवळीत सक्रीय सहभागी होत समाजात अमुलाग्र बदल घडवून आणण्याचे पहिले पाऊल टाकत बेटमोगरा येथे पहिला भव्य दिव्य असा ऐतिहासिक राष्ट्रिय प्रबोधनकार मा.भिमशाहीर साहेबराव ये यांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम
सन २००८ मध्ये प्रकाश दत्ता सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. हा कार्यक्रम बेटमोगरा व परिसरात ऐतिहासिक ठरला. प्रकाश दत्ता सोनकांबळे यांचे सामाजिक,धार्मिक कार्य अद्यापही समाजात प्रेरणादायी आहेत.माझा पाठीराखा भाऊ प्रकाश दत्ता सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सन २०१४ मध्ये धर्मादाय कार्यालय नांदेड येथे माता रमाबाई भीमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था मौजे बेटमोगरा या नावाने एक संस्था नोंदणी करून या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मी पत्रकार भारत सोनकांबळे विवीध सामाजिक,शैक्षणिक, व महापुरुषांच्या जयंत्या महोत्सव असे समाज उपयोगी विविध उपक्रम ते प्रतिवर्षी घेत असतात. सद्यस्थितीतील समाजातील ताजे उदाहरण पाहिलं तर आपणास लक्षात येईल की हल्ली सर्वत्र प्रत्येक कुटुंबात भावा भावाचे वडिलोपार्जित संपत्ती मुळे, व इतर काही कारणांमुळे वाद विवाद पाहायला मिळतात परंतू माझा मोठा भाऊ प्रकाश दत्ता सोनकांबळे यांनी आपल्या आयुष्यात वडील हयात असताना व वडिलांच्या निधनानंतर देखील आपल्या सर्व लहान,मोठ्या भावंडाना एकत्रीत पने एकमनाने,एकदिलाने कोणीही आपापसात वाद न करता कुटुंबातील सर्वानाच सोबत घेऊन आपल आयुष्य जगण्यासाठी मार्गदर्शन करतोस याचा सर्व भावंडाना तुझा अभिमान आहे.
म्हणूनच तूझ्या कार्यामुळे तुला आम्ही कुटुंबातील सर्व व्यक्ती कुटुंबाचा आधारवड असेच संबोधतोत. कारण तुच कुटुंबातील सर्व सदस्यांना सुख दुःखात साथ देणे, आपले नातेवाईक आपल्यापासून कोणत्याच कारणांमुळे दुरावू नये यासाठी तुझा नेहमीच प्रयत्न असतो. आज दि.२९ जून २०२५ रोजी तुझा वाढदिवस त्यानिमीत्य हा थोडक्यात लेखाजोखा.
दोन भावांचे प्रेम म्हणजे एक अतूट आणि खास नातं. हे प्रेम केवळ रक्ताचं नसून, ते विश्वास, काळजी आणि एकमेकांना साथ देण्यावर आधारित असतं. दोन भावांमध्ये नेहमीच एक वेगळी आपुलकी आणि प्रेम दिसून येतं, जे त्यांना एकमेकांना समजून घेण्यास आणि अडचणीच्या काळात एकमेकांना साथ देण्यास मदत करतं.भावंडाचे प्रेम हे सर्वात वेगळं असतं. कारण कितीही भांडणं झाली तरी वेळप्रसंगी एकमेकांना जीवाला जीव लावणारी भावंडेच असतात. तुमचा भाऊ मोठा असो वा छोटा तुमच्यापाठीशी सदैव खंबीर पणे उभा असतो. वडिलांनंतर भावासारखा दुसरा बापमाणूस तुम्हाला जगात शोधूनही सापडणार नाही.प्रिय अण्णा तू केलेल्या त्या सर्व गोष्टींसाठी मी तूझा नेहमी कृतज्ञ असेन जे तू माझ्यासाठी आयुष्यभर केलंस. तू असाच आनंदी आणि माझ्यापाठीमागे खंबीर उभा राहा. तुला या जन्मदिनी पुढील आयुष्यासाठी सुखी व निरोगी आरोग्य सह दीर्घायुष्य प्राप्त होवो तसेच तुझ्या जीवनातील प्रज्ञा शील करुणा, वृद्धिंगत होवो याच मंगल कामना तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी व्यक्त करतो. तुला जन्मदिनाच्या खुप खुप मंगलमय शुभेच्छा……

भारत दत्ता सोनकांबळे (पत्रकार)
संपादक – स्वाभिमान भारत न्युज
जिल्हाकार्याध्यक्ष- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,नांदेड
मो.9545196519

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button