माऊली सेवा मंडळाच्या वतीने वारकऱ्यांना आरोग्य सेवा

नातेपुते येथे केमिस्ट असोसिएशनने केले औषधी वाटप
मुखेड प्रतिनिधी:- १ जुलै २५
येथील माऊली सेवा मंडळ व केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दहा वषार्पासूनसामाजिक बांधिलकी जोपासत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी दिंडीत राज्यातून सहभागी होणाऱ्याहजारो वारकऱ्यांसाठी नातेपुते येथे मोफत आरोग्यसेवा देण्याचा सामाजिक उपक्रम मंडळाच्या वतीनेराबविण्यात येतो. याहीवर्षी नातेपुते येथे माऊली सेवामंडळ तसेच केमिस्ट असोसिएशनच्या वतिनेवारक–यांना मोफत औषधी वाटप व आरोग्यसेवा देण्यात आली त्यामुळे या सामाजिक स्तुत्य उपक्रमाचेसर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे. दरवर्षी विठ्ठल–रूक्मिणी व संत माऊलींच्या दर्शनासाठी दिंडी तसेचवारिच्या माध्यमातून पंढरपूरकडे निघालेल्या हजारो वारक–यांना मुखेड तालुक्यातील माऊली सेवा मंडळव केमिस्ट असोसिएशन मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय मदत दिली जातआहे ही परंपरा मागील दहा वषार्पासून चालत आहे. सामाजिक बांधिलकितुन करण्यात येत असलेल्याउपक्रमांत चालणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना चालताना होणारे गुडघेदुखी, अंगद खी, उलटी, मळमळ, त्वचाविकार, डोळ यांचे त्रास, थकवा इत्यादी तक्रारींवर तत्काळ तपासणी वमोफत औषधोपचार करण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे आपण काहीतरी समाजाच देणलागतो या उद्धात भावनेने सामाजिक बांधिलकी म्हूनन आम्ही मनोभावे वारक–यांची सेवा करतो असेमाऊली सेवा मंडळाने सांगितले.



