क्राईम

दुर्दैवी घटना : खदानीत बुडून दोन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात सर्वत्र हळहळ

नांदेड प्रतिनिधी:- ३० मे २५

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील गारगव्हाण गावात मोठी दुर्दैवी घटना घडली आहेखदानीतबुडून दोन शाळकरी अल्पवयीन मित्रांचा मृत्यू झालाया घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये 15 वर्षीय संघर्ष परघने आणि 13 वर्षीय निखिल वाढवे यांचा समावेश आहेसंघर्ष परघने हा आपल्या मामाच्या गावीगारगव्हाण येथेएका लग्नासाठी आलेला होतारविवारी सकाळी संघर्ष आणि त्याचा मित्र निखिल दोघेही शेताकडे चालत जात होतेपावसामुळे रस्त्यात चिखल साचलेला होताचालताना अचानक संघर्षचा पाय घसरून तो शेजारच्या खोल खदानीत पडलासंघर्षला वाचवण्यासाठी निखिल धावून गेलापण तोही त्याच खदानीत बुडाला.

स्थानिकांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केलापरंतु तोवर उशीर झाला होताही दुर्दैवी घटना गावासाठीअत्यंत धक्कादायक असूनदोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहेगावकऱ्यांनी प्रशासनाकडे अशा धोकादायक खदानींची तात्काळ पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button