सामाजिक

नांदेड जिल्ह्यात तमसा, मुक्रामाबाद आणि इस्लापूर येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालयांना मंजुरी

श्रमिक एकता न्यूज नांदेड : २२ सप्टेंबर २६

जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि महसूल प्रशासनाचे विकेंद्रीकरणकरण्यासाठी राज्य शासनाने हदगाव तालुक्यातील तमसा, मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद आणिकिनवट तालुक्यातील इस्लापूर येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालये सुरू करण्यास प्रशासकीयमान्यता दिली आहे. 

२२ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार या तिन्ही तालुक्यांतील महसूल मंडळांचीपुनर्रचना करण्यात आली असून, हदगाव तहसील अंतर्गत ५ तर तमसा अपर तहसील अंतर्गत तमसा, आष्टा व मनाठा ही ३ मंडळे राहतील; मुखेड तहसील अंतर्गत ५ तर मुक्रामाबाद अपर तहसील अंतर्गतमुक्रामाबाद, बाहाळी व अंबुलगा (बु.) ही ३ मंडळे राहतील; तसेच किनवट तहसील अंतर्गत ६ तर इस्लापूरअपर तहसील अंतर्गत इस्लापूर, जलधारा व शिवणी ही ३ मंडळे समाविष्ट करण्यात आली आहेत. 

या कार्यालयांसाठी आवश्यक अधिकारी–कर्मचाऱ्यांची पदे भरण्याचे निर्देश देण्यात आले असून, कायमस्वरूपी इमारत होईपर्यंत तात्पुरत्या जागेत कामकाज तातडीने सुरू केले जाणार असल्यानेनागरिकांना मुख्य तालुक्याच्या ठिकाणी न जाता स्थानिक पातळीवरच महसूल सेवा मिळण्याचा मार्गसुकर झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button