क्राईम

मुखेड पोलिसांचा जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा; चार दुचाकींसह २ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघांना बेड्या

श्रमिक एकता न्यूज नेटवर्क मुखेड: २२ सप्टेंबर २६

मुखेड तालुक्यातील बोंमनाळी नवीन आबादी येथे रस्त्यावर उघडपणे सुरू असलेल्या ‘तिरट‘ नावाच्या जुगारावर मुखेड ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री छापा मारून जोरदार कारवाई केली आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि चार मोटारसायकलींसह एकूण २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्तकरण्यात आला असून तिघांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कामठेवाड यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक अभिजित तुतुरवाड, पोलीस हवालदार गित्ते, पोलीस शिपाई इंगोले व फंताडे हेपथक अवैध धंद्यांची माहिती काढण्यासाठी गस्तीवर होते. दरम्यान, बोंमनाळी फाटा येथे गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संभाजी घोडेके यांच्या किराणा दुकानासमोर मेन रोडवर काही इसम गोल बसून पैशांवर ‘तिरट‘ नावाचा जुगार खेळत आहेत.

पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२:१५ वाजता सदर ठिकाणी अचानक छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आणि काहींनीअंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. मात्र, पोलिसांनी घेराव घालून बालाजी मनोहर गोजेगावे, गणेश जयवंता मोरे आणि गोपाळ गुडांजी मोरे (सर्व रा. बोंमनाळी, ता. मुखेड, जि. नांदेड) या तिघांना जागीचपकडले. चौकशीत बारक्या गंगाधर घोडेके (रा. बोंमनाळी) व त्याचे इतर साथीदार पळून गेल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, ४,५०० रुपयांची रोख रक्कम आणि जुगारासाठी आणलेली अ‍ॅक्टिव्हा, होंडा शाईन, दोन पॅशन प्रो अशा चार दुचाकींसह एकूण २ लाख १४हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अभिजित तुतुरवाडयांच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवूनपुढील तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांच्या या मध्यरात्रीच्या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button